![]()
मनपा हद्दवाढ भागात विद्युत पथदिवे नसल्याने नागरिक व वंचित बहुजन आघाडीने सोमवारी अनोख्या पद्धतीने निषेध करत अभियंत्यांना कंदील भेट दिला. यावर तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वंचितचे गटनेते नीलेश देव यांनी दिला. महापालिका हद्दवाढ भागात मूलभूत सुविधांना नागरिकांनी नेहमीच उपस्थिती लावली आहे. या भागात रस्ते, पाणी, स्वच्छता, खुले भूखंडांचा विकास न होणे यावर नागरिक संताप व्यक्त करतात. दरम्यान आता पथदिव्यांचा मुद्दा ऐरणीवर आहे. न्यू तापडीया नगर परिसरातील सोयी-सुविधा निधी अंतर्गत ९ मे २०१८ रोजी मंजूर झालेला ठराव सात वर्षांनंतरही पूर्णपणे अंमलात न आल्याने प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांचा संयम सुटत आहे. चोपडे ले-आऊट ते आपातापा रोड ते खरप परिसरात उभारण्यात आलेल्या शेकडो विद्युत पोलवर स्ट्रीट लाईट न बसवल्यामुळे परिसर अक्षरशः अंधारात ढकलला गेला आहे. सर्व निष्क्रियतेच्या विरोधात सोमवारी नागरिकांनी विद्युत विभागावर कंदील आंदोलन करत प्रशासनाचा निषेध उर्वरित पान ४ विधानसभेचा अकोला पूर्व मतदारसंघ हा २०१४ पासून भाजपच्या ताब्यात आहे. न्यू तापडीया नगर व पुढे अन्य नगरांचा अकोला पूर्व मतदारसंघात समावेश आहे. मनपा निवडणुकीत उबाठाच्या सहापैकी पाच नगरसेवक व वंचितचे पाचही नगरसेवकांचा प्रभाग अकोला पूर्वमध्ये येतो. मनपामध्ये सत्ता स्थापनेतही उबाठा, वंचित, काँग्रेस, राकांसोबत होती. त्यामुळे वंचितसह अन्य विरोधी पक्ष अकोला पूर्वमधील सुविधा, समस्यांवरून भाजपला राजकीय कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत. गत नऊ वर्षांपासून न्यू तापडीया नगरातील रेल्वे उड्डाणपूल रखडला आहे. यावरूनही वंचित व उबाठाने आंदोलने केली. वंचितकडून रस्त्यावर, शासनाकडे, रेल्वे विभागाकडेही पाठपुरावा करण्यात येत आहे. आता पथदिव्यावरूनही वंचितने आंदोलन छेडण्याचे संकेत दिले आहेत. भाजपला राजकीय कोंडीत पकडण्याचा प्रयत्न
Source link
हद्दवाढ भागात अंधार; अभियंत्यांना दिला कंदील:उपाय न केल्यास आंदाेलन; वंचितचा इशारा