Headlines

पुणे नवरात्रौ महोत्सवाचा शुभारंभ 11 ऑक्टोबरला, मंत्री सामंत करणार उद्घाटन:‘शिवशक्ती’, ‘खंडोबा-बानू विवाह सोहळा’ आणि ‘महाराष्ट्राच्या महानायिका’ प्रमुख आकर्षण




पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या ३२ व्या वर्षाचा शुभारंभ रविवार, ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे. राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे महोत्सवाचे उद्घाटन होईल. उद्घाटन सोहळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह पाच मान्यवरांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल यांनी दिली. उद्घाटन सोहळ्यात अरुंधती पटवर्धन यांचा समूह ‘शिवशक्ती’ हा भरतनाट्यम कलाविष्कार सादर करणार आहे. त्यानंतर विनोद धोकटे, स्वाती धोकटे व सहकलाकार ‘खंडोबा-बानू विवाह सोहळा’ हा कार्यक्रम सादर करतील. सोहळ्याचे विशेष आकर्षण असलेल्या ‘महाराष्ट्राच्या महानायिका’ या नृत्याविष्कारात अभिनेत्री भार्गवी चिरमुले, वैशाली जाधव, सानिया चौधरी, श्वेता परदेशी, झेबा शेख, डॉ. सुखदा खांडगे, मृण्मयी मोघे, आयली घिया आणि ऋजुता जुन्नरकर सहभागी होणार आहेत. या नृत्याविष्काराचे दिग्दर्शन पायल वृंदाच्या निकिता मोघे यांनी केले आहे. यंदाच्या ‘जीवन गौरव’ पुरस्कारासाठी क्रीडा क्षेत्रातून डॉ. संजय दुधाने, वैद्यकीय क्षेत्रातून डॉ. ऋतुपर्ण शिंदे, सामाजिक क्षेत्रातून डॉ. विजय फळणीकर, सांस्कृतिक क्षेत्रातून निकिता मोघे आणि लोककलेच्या क्षेत्रातून वैशाली समसापूरकर यांची निवड करण्यात आली आहे. या सोहळ्याला केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार, महापौर मंजुषा नागपुरे, डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार डॉ. विश्वजीत कदम, आमदार विजय शिवतारे आणि युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक उपस्थित राहणार आहेत. घटस्थापनेनिमित्त रविवारी सकाळी ९.१८ वाजता शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिरात आबा बागुल व जयश्री बागुल यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *