Headlines

गरब्यात 'लव्ह जिहाद'चा प्रयत्न केला तर पोलिसांचा दांडिया चालेल!:नितेश राणे म्हणाले- रोहित पवारांचे आंदोलन म्हणजे 'बिग बॉस'मधील थकलेल्या कलाकारांचा अड्डा




“महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचारांचे आणि हिंदू समाजाने निवडून दिलेले मजबूत सरकार सत्तेत आहे. नवरात्रोत्सवात दांडिया आणि गरब्यामध्ये कोणी नाव बदलून, बनावट ओळख सांगून ‘लव्ह जिहाद’ करण्याचा किंवा आमच्या हिंदू माता-भगिनींकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला, तर पोलिसांच्या काठीचा असा दांडिया चालेल की पुढच्या शुक्रवारी उठता-बसताना काय त्रास होतो ते त्यांना कळेल,” असा अतिशय कडक आणि थेट इशारा भाजप नेते तथा मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नितेश राणे यांनी गरबा आयोजनातील नियमावली, दिल्लीत जंतरमंतरवर ‘सीजेपी’ आणि काँग्रेसच्या आंदोलनातील धरपकड, पुण्यातील एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांचे आंदोलन, तसेच ठाकरे बंधू आणि राहुल गांधी यांच्या विधानांवरून विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. नवरात्रीत दांडिया खेळायचा असेल तर घरवापसी करा उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली. “हिंदू धर्मात गरबा आणि दांडियाला अत्यंत पवित्र स्थान आहे. ज्यांना दांडिया खेळायची हौस असेल, त्यांनी आधी मूळ हिंदू धर्मात ‘घरवापसी’ करावी, मंदिरात जाऊन महाआरती करावी, हनुमान चालीसा म्हणावी आणि मग खुशाल दांडिया खेळावा; आमची काहीही हरकत नाही. पण दाढी कुरवाळत आणि गोल टोप्या घालून कोणी आमच्या उत्सवात घुसण्याचा प्रयत्न केला, तर ते खपवून घेतले जाणार नाही.” पोलीस दांडिया खेळायला सक्षम “आमच्या पोलिसांपेक्षा चांगला दांडिया कोणीही खेळू शकत नाही. कोणाला जायचे असेल तर त्यांनी खुशाल जावे, पण नंतर त्रास झाला म्हणून रडारड करू नये. विश्व हिंदू परिषद आणि हिंदुत्ववादी संघटनांचे अशा प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष आहे.” पुण्यातील आंदोलन म्हणजे ‘बिग बॉस’चा बंगला; रोहित पवारांनी चिंता करू नये पुण्यातील एमपीएससी आंदोलनावर बोलताना त्यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली. “पुण्यात चाललेले हे आंदोलन आता विद्यार्थ्यांचे राहिलेले नसून ते पूर्णपणे राजकीय आंदोलन बनले आहे. बिग बॉसच्या घरात जसे बाहेर काम नसलेले, करिअर संपलेले आणि स्ट्रगलर लोक गोळा केले जातात, तसेच रोहित पवारांच्या या आंदोलनात सगळे थकलेले आणि राजकीय दृष्ट्या चुकलेले चेहरे गोळा झाले आहेत. कोणाला पप्पू Part-2 व्हायचे आहे, तर कोणाला अभिजीत दिपके Part-2 व्हायचे आहे.” विद्यार्थी सुरक्षित हातात “बारामती ॲग्रो आणि विश्वजित कदमांच्या कॉलेजची मुले वजा केली, तर तिथे खरे विद्यार्थी किती उरतात हे सर्वांना ठाऊक आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १२ पैकी बहुतांश मागण्या तात्काळ मान्य केल्या असून, व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखालील समिती सुधारणांवर काम करत आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य पूर्णपणे सुरक्षित हातात असल्याने रोहित पवारांनी काळजी करण्याचे ढोंग करू नये.” पंतप्रधानांवर खालच्या पातळीवर टीका करणारे पाकिस्तानच्या स्क्रिप्टवर बोलतात दिल्लीतील आंदोलनाबाबत बोलताना नितेश राणे यांनी ध्रुव राठी आणि काँग्रेसवर निशाणा साधला. “देशाच्या पंतप्रधानांविषयी खालच्या पातळीवर भाषा वापरणे ही केवळ पाकिस्तानची आणि अतिरेक्यांची प्रवृत्ती आहे. कराची, इस्लामाबादमध्ये जे लोक मोदींविरोधात बोलतात, तीच भाषा आज देशातील काही कथित आंदोलक बोलत आहेत. ध्रुव राठीसारखे युट्युबर्स, ज्यांनी प्रभू रामचंद्र आणि माता सीतेवर अभद्र टिप्पण्या केल्या, ते आज देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. या आंदोलनामागे पाकिस्तानशी संबंधित सोशल मीडिया हँडल्स काम करत असल्याचा संशय आहे.” ते पुढे म्हणाले, “भारतामध्ये कोणालाही येऊन अशांतता पसरवण्याची परवानगी दिली जाणार नाही, हाच कडक संदेश दिल्ली पोलिसांनी आज घेतलेल्या कठोर भूमिकेतून दिला आहे.” व्होटचोरी झाली असेल तर राहुल-प्रियंकांनी राजीनामे द्यावेत! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि संजय राऊत यांच्या विधानांवर प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, “जर देशात व्होटचोरी झाली आहे आणि निवडणूक आयोग दोषी आहे, तर मग राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि विरोधी पक्षांच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांनी नैतिकतेच्या आधारावर आधी आपले राजीनामे द्यावेत. कर्नाटक आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांचे राजीनामे घेऊन मगच त्यांनी दुसऱ्यांना सल्ले द्यावेत.” संजय राऊतांचे भाकीत हास्यास्पद “संजय राऊत 2024 पासून सरकार पडण्याच्या तारखा देत आहेत. दोन महिन्यांत पडेल, तीन महिन्यांत पडेल म्हणता म्हणता त्यांची स्वतःची अवस्था बिकट झाली आहे. त्यांनी सरकार पडण्याची स्वप्ने पाहण्यापेक्षा आपल्या मालकाच्या पुत्राला (आदित्य ठाकरे) कधी तुरुंगात जावे लागेल, याचे भाकीत करावे,” असा जोरदार टोला नितेश राणे यांनी लगावला. —————————————————- हेही वाचा… अभिजीत दिपकेंना ताब्यात घेताच आई भावुक:म्हणाल्या- हातात काठ्या घेऊन रील्स बनवणाऱ्यांना मोकळे रान अन् देशासाठी लढणाऱ्या माझ्या मुलाला बेड्या? पुण्यातील एमपीएससी आंदोलन आणि दिल्लीतील देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना, ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. दिपकेंना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून, आईला माध्यमांसमोर बोलताना अश्रू अनावर झाले. तर, “हे सरकार लोकशाही मानत नाही, आणीबाणीनंतर पहिल्यांदाच देशात अशी हुकूमशाही सुरू आहे,” असा संतापजनक आरोप करत दिपके यांच्या वडिलांनी केंद्र व राज्य सरकारवर थेट हल्ला चढवला आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *