![]()
जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुका एकमेव असा आहे, की नवे जुने भाजपचे नेते कार्यकर्ते एक दिलाने काम करत आहेत. भाजप पक्षासाठी मोहोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये विश्वासू ,निष्ठावंत नेत्याची गरज होती. ती आता माजी आमदार राजन पाटील यांच्या माध्यमातून मिळाली. त्यांनी काहीच मागितले नाही. परंतु येणाऱ्या पुढील काळामध्ये ते आमच्या मांडीला मांडी लावून बसलेले तुम्हा सर्वांना दिसतील. त्याचबरोबर विधान परिषदेच्या निवडणुकीत सोलापूरनंतर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान मोहोळ तालुक्यातून दिसेल असे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. मोहोळ येथे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने लोकसेवा कॉन्फरन्स हॉलमध्ये जिल्हा परिषद सदस्य, नगरपंचायत, नगरपरिषद, नगराध्यक्ष, नगरसेवक, सभापती यांची बैठक बोलवण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सरकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, विधानपरिषदेचे उमेदवार माजी आमदार राजेंद्र राऊत आदी उपस्थित होते. प्रतिनिधी | कुर्डुवाडी/ माढा/ करमाळा ऐरवी निधी वाटपावरुन विरोधकांना डिवचणारे पालकमंत्री जयकुमार गोरे हे विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे गटाच्या नगरसेवकांत मत पेरणी करण्यासाठी कुर्डुवाडीत धनंजय डिकोळे यांच्या निवासस्थानी शनिवारी पोहोचले होते. त्यांच्या समवेत महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत व अन्य नेते होते. दरम्यान दुपारी १ वाजता प्रा. शिवाजी सावंत यांच्या कार्यालयात जाऊन त्यांनी संवाद साधला. डिकोळे पाठोपाठ जेऊरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार नारायण पाटील यांच्या घरी ते पोहोचले. थेट विरोधकांना गोजारणे सुरु केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. माढा, कुर्डुवाडी नगर परिषद आणि ७ जिल्हा परिषद सदस्यांच्या विविध राजकीय गटांची व नेत्यांची भेट घेतली. डिकोळे यांच्या निवासस्थानी नगराध्यक्षा जयश्री भिसे आणि उद्धव सेनेच्या सर्व नगरसेवकांसमवेत चहापाणी घेत पालकमंत्र्यांनी गुप्त संवाद साधला. दुपारी मंत्री गोरे माढा येथे प्रा. शिवाजी सावंत यांच्या कार्यालयाला गेले. त्यानंतर माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या माढेश्वरी बँकेत जाऊन त्यांच्या गटातील मतदार सदस्यांसोबत चहा घेत रणनीती आखली. तेथून पुढे माढ्याच्या नगराध्यक्षा मीनल साठे यांच्या घरी जाऊन माजी आमदार धनाजी साठे व दादासाहेब साठे यांच्याशी निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा केली. १४ नगरसेवकांसमवेत निमगावमध्ये केली चर्चा कुर्डुवाडीतील भेटीगाठी आटोपून त्यांनी आपला मोर्चा निमगावकडे वळवला. तेथे माजी आमदार संजय शिंदे यांच्या निवासस्थानी कुर्डुवाडीच्या राष्ट्रवादी (अजित पवार गट) व रिपाइं (आठवले गट) यांच्या १४ नगरसेवकांसमवेत महत्त्वाची बैठक घेतली. तेथेच स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. तेथून पुढील दौऱ्यासाठी करमाळ्याकडे रवाना झाले. प्रतिनिधी | अकलूज विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उत्तमराव जानकर यांनी मोहिते-पाटील यांच्यावर ‘केसाने गळा कापल्याचा’ थेट आरोप केल्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे झालेली ही युती दोन्ही गटांची गरज असून, सध्याचा वाद हे केवळ ‘पेल्यातील वादळ’ ठरेल, अशी आशा कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे. मोहिते- पाटील व जानकर हे माळशिरस तालुक्यातील एकमेकांचे पारंपरिक राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही गट भाजपसोबत असल्याने त्यांनी एकत्र काम केले होते. माझा संघर्ष तुम्ही पाहिला आहे : राऊत जिल्ह्यातील सर्वच लोकांना माहित आहे. माझा संघर्ष तुम्हीही जवळून पाहिला आहे. त्यामुळे सगळ्यांपेक्षा जास्त आनंद तुम्हाला होईल. तुमचे आशीर्वाद ही माझ्यासोबत राहणार आहेत. सर्व सभासद बंधू भगिनींनी मला सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. सर्वजण मिळून चांगल्या प्रकारे काम करून मोठ्या मताधिक्याने निवडून द्या. एका जागेवरून दोन्ही गटात मतभेद,गैरसमज या दोन्ही गटांनी केवळ लोकसभा- विधानसभाच नव्हे, तर अकलूज नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही एकत्र येत सत्ता राखली आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एका जागेवरून दोन्ही गटात मतभेद आणि गैरसमज निर्माण झाले असले, तरी भाजपला रोखण्यासाठी ही युती कायम राहणे दोन्ही बाजूंची मोठी गरज आहे.
Source link
पालकमंत्र्यांनी विरोधकांना गोंजारले,मतांसाठी आघाडीतील नेत्यांच्या घरी:राष्ट्रवादीचे आमदार नारायण पाटील यांच्याशी जेऊर येथे गुप्तगू