Headlines

पोलिस बनून एक कोटी लुटण्याचा प्रयत्न:नवले पुलाजवळ व्यावसायिकाला अडवून दरोड्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल




मुंबई-बंगळूरु बाह्यवळण मार्गावरील नवले पुलाजवळ पोलिस असल्याची बतावणी करत एका व्यावसायिकाकडील एक कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी नऱ्हे पोलिसांनी पाच अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तळेगाव दाभाडे येथील ३५ वर्षीय व्यावसायिक सिंहगड रस्त्यावरून नऱ्हे भागातील एका बँकेकडे मोटारीतून निघाले होते. त्यांच्यासोबत मोटार चालक आणि अन्य एक व्यक्ती मोटारीत होते. नवले पुलाजवळ वेगवेगळ्या दुचाकींवरून आलेल्या पाच चोरट्यांनी त्यांची मोटार अडवली. चोरट्यांनी स्वतःला पोलीस असल्याचे भासवून व्यावसायिकाची चौकशी सुरू केली. मोटारीतून बेकायदा मार्गाने मिळालेली मोठी रक्कम नेली जात असल्याचा आरोप करत चोरट्यांनी व्यावसायिकाकडील एक कोटी रुपयांची रोकड असलेली पिशवी हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला.व्यावसायिकाने आरडाओरडा करत चोरट्यांना विरोध केला. त्यामुळे चोरटे दुचाकींवरून घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच नऱ्हे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. नऱ्हे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांनीही घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी नवले पूल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध सुरू आहे. स्वारगेट एसटी स्थानकात चौघांचे मोबाइल चोरी स्वारगेट एसटी स्थानकात चार प्रवाशांचे मोबाइल चोरुन नेण्यात आल्याची घटना घडली. याबाबत एका तरुणाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार २२ वर्षीय तरुण मूळचा उत्तर प्रदेशातील आग्रा येथील आहे. ते स्वारगेट एसटी स्थानकात आले. एसटी स्थानकाच्या आवारातील नाथ जल केंद्रातून ते पाण्याची बाटली खरेदी करत होते. तक्रारदार तरुण आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांनी प्रवासी बॅगेत मोबाइल ठेवले होते. चोरट्याने प्रवासी बॅगेत ठेवलेले चार मोबाइल लांबविले. पोलीस उपनिरीक्षक एन पवार पुढील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *