![]()
वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला अकोट शहर व तालुक्यात संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रात आंदोलक शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र आले. त्यांनी बंदचे आवाहन केले. त्यानंतर त्यांनी शहरातील मुख्य मार्गांवरून फिरत व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. व्यापाऱ्यांनी सुरुवातीला प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली. मात्र आंदोलक पुढे गेल्यानंतर दुपारपर्यंत बहुतांश बाजारपेठा पुन्हा सुरू झाल्या. त्यामुळे बंदला संपूर्ण प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र दिसून आले. दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला जिल्ह्यातील समविचारी संघटनांनी पाठिंबा दर्शवला होता. याबाबतचे निवेदन अकोट शहर पोलिस ठाण्यात देण्यात आले होते. त्यानुसार सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले. घोषणाबाजी करत व्यापाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. सकाळच्या काही तासांमध्ये शहरातील दुकाने बंद राहिली. मात्र आंदोलकांचा मोर्चा पुढे सरकल्यानंतर व्यापाऱ्यांनी हळूहळू दुकाने उघडण्यास सुरुवात केली. दुपारपर्यंत मुख्य बाजारपेठ, किराणा, भाजीपाला, कपडे, औषधांची दुकाने तसेच इतर व्यावसायिक प्रतिष्ठाने नियमितपणे सुरू झाली होती. दरम्यान, ग्रामीण भागात बंदच्या आंदोलनाची तीव्रता काही प्रमाणात अधिक जाणवली. तालुक्यातील देवरी फाटा येथे आंदोलकांनी सकाळी रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे काही काळ अकोट- अकोला मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. वाहनांच्या रांगा लागल्या. प्रवाशांना काही काळ प्रतिनिधी | पातूर दिल्ली येथील जंतर-मंतरवर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली होती. त्याला प्रतिसाद देत पातूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. आंदोलकांनी विद्यार्थ्यांना मारहाणीचा निषेध करत निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, हा हल्ला म्हणजे लोकशाहीवर थेट आघात असून आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारने दडपशाहीचा मार्ग अवलंबला आहे, असा आरोप करण्यात आला. या बंदला शिवसेना (उबाठा), युवा समिती संघटना, वकील संघटना, छत्रपती फुले शाहू आंबेडकर संघटना, महाराष्ट्र शेतकरी संघटनेसह इतर सामाजिक व राजकीय संघटनांचा समावेश होता. व्यापारी व नागरिकांनी सहकार्याची भूमिका दाखवत बंदला पाठिंबा दर्शवत दुकाने बंद ठेवली. पातूरमधील व्यापारी संघटना, दुकाने, बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये, ट्युशन क्लासेस, ऑटोरिक्षा चालक व व्यावसायिक प्रतिष्ठानांनी व्यवहार बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. शहरातील सर्व व्यवहार सुरळीत शहरातील बाजारपेठा, शैक्षणिक संस्था आणि दैनंदिन व्यवहार नियमित सुरू झाल्याने बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र होते. गैरसोयीचा सामना करावा लागला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आंदोलकांची समजूत काढली. त्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. याशिवाय वंचित बहुजन आघाडीतर्फे मुंडगाव, वरूळ- जऊळका, अडगाव खुर्द आणि सावरा परिसरातही बंदचे आवाहन करण्यात आले. काही गावांमध्ये व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने अल्पकाळ दुकाने बंद ठेवली. तर अनेक ठिकाणी दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू असल्याचे दिसून आले. एकंदरीत अकोट शहर व तालुक्यात महाराष्ट्र बंदच्या हाकेला पूर्णतः यश मिळाले नाही. तरी काही भागात प्रतिसाद पाहायला मिळाला. सकाळी आंदोलनाचा प्रभाव जाणवला. दुपारनंतर परिस्थिती पूर्णपणे पूर्ववत झाली. बंददरम्यान चोख पोलिस बंदोबस्त कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी निखिल पाटील व शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार किशोर जूनघरे स्वतः लक्ष ठेवून होते. अकोट पोलिसांचा यावेळी कडेकोट बंदोबस्त तैनात होता. यावेळी पाच पोलिस अधिकारी, ४५ पोलिस अंमलदार, एसआरपीएफचे एक प्लाटून, आरसीपीचे एक प्लाटून, एसएफचे एक प्लाटून, ५५ गृहरक्षक दलाचे जवान तैनात होते. याशिवाय शहरातील संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉइंट उभारण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विविध भागांत पोलिसांची स्वतंत्र पेट्रोलिंग पथके तैनात केली होती.
Source link
बंदला अकोट शहरात संमिश्र प्रतिसाद:देवरी फाट्यावर रस्तारोको; वाहतूक ठप्प, पोलिसांच्या मध्यस्तीने मार्ग मोकळा