Headlines

बांधकाम व्यावसायिकाची 16.80 लाखांची फसवणूक:30 कोटींच्या कर्ज मंजुरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक




पुण्यात एका बांधकाम व्यावसायिकाची १६ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बांधकाम व्यवसायासाठी ३० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिकाची २०२१ मध्ये आरोपींशी ओळख झाली होती. आरोपींनी त्यांना बांधकाम व्यवसायासाठी ३० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले. कर्ज मंजुरीची प्रक्रिया आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर कर्ज मिळेल, असे आरोपींनी सांगितले होते. यासाठी आरोपींनी तक्रारदाराकडून वेळोवेळी १६ लाख ८० हजार रुपये घेतले. मात्र, ठरल्याप्रमाणे कर्ज मंजूर झाले नाही. कर्ज मंजूर न झाल्याने तक्रारदाराने आरोपींकडे विचारणा केली असता, आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दाखल केली. सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. नदीपात्रातील रस्ता वाहतुकीस बंद पुणे शहरातील खडकवासला धरण साखळीतून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्यानंतर नदीपात्रातील रस्ता पाण्याखाली गेला. नदीपात्रातील रस्ता पाण्याखाली गेल्यानंतर वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांनी नदीपात्रातील रस्ता वाहतुकीस बंद केला. खडकवासला धरण साखळीत गुरुवारी सायंकाळनंतर संततधार पाऊस झाला. पाऊस झाल्यानंतर धरणातून विसर्ग करण्यात आला. शनिवारी दुपारी विसर्ग वाढविण्यात आला. त्यानंतर नदीपात्रातील रस्ता, तसेच बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला. नदीपात्रातील रस्त्याचा वापर नारायण पेठ, शनिवार पेठ, तसेच कोथरूडकडे जाणारे वाहन चालक करतात. नदीपात्रातील रस्ता पाण्याखाली गेल्यानंतर या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. त्यानंतर नारायण पेठ, शनिवार पेठ परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली. नदीपात्राकडे जाणारे रस्ते वाहतूक पोलिसांनी लोखंडी कठडे टाकून बंद केले. नदीपात्रातील रस्त्याचा वापर वाहनचालकांनी करु नये. पाणी ओसरल्यानंतर रस्ता वाहतुकीस खुला करुन दिला जाईल, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले. खडकवासला धरणसाखळीतून मोठ्या प्रमाणवर सोडण्यात आल्यानंतर नदीपात्रातील महत्त्वाच्या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *