Headlines

बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धेत पुणे, फलटण-बारामतीचे संघ विजयी:10 जिल्ह्यांतील 85 संघांनी स्पर्धेत घेतला सहभाग,पारितोषिकांचे केले वितरण‎



अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय‌ येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न महाविद्यालयांच्या आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन व टेबल टेनिस विद्यापीठ स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत महाराष

.

स्पर्धेत बॅडमिंटन (मुले) गटात शासकीय कृषी महाविद्यालय, पुणे, बॅडमिंटन (मुली) गटात कृषी महाविद्यालय, फलटण, टेबल टेनिस (मुले) गटात शासकीय कृषी महाविद्यालय, पुणे, तर टेबल टेनिस (मुली) गटात डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, बारामती यांनी विजेतेपद पटकाविले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे क्रीडा समन्वयक डॉ. विशाल वाळे, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी स्वयंसेवक तसेच विविध समित्यांच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एस. वाघ यांनी केले, तर आभार प्रा. जी. बी. बाचकर यांनी मानले. पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक श्वेता नागवडे यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *