Headlines

भाजपचे शिरसाठ यांचा पहिल्या फेरीत 455 मते मिळवत विजय‎:निकालानंतरच्या विजयी मिरवणुकीत शिरसाठ यांच्या कार्यकर्त्यांच्या पोस्टरचीच चर्चा‎



औरंगाबाद-जालना विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच एकहाती वर्चस्व सिद्ध केले. जाहीर झालेल्या निकालानुसार भाजपचे उमेदवार सुहास शिरसाठ यांनी सकाळी साडेनऊ वाजता पहिल्याच फेरीत ४५५ मते मिळवून विजय मिळवला. महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश

.

शहरातील शासकीय औषधनिर्माण महाविद्यालयात सकाळी ८ वाजता चार टेबलांवर मतमोजणी सुरू झाली. एकूण ६३७ पैकी ६३० मतदारांनी मतदान केले होते. यातील ५ मते अवैध ठरल्यामुळे विजयासाठी ३१३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. शिरसाठ यांनी पहिल्याच फेरीत ४५५ मते घेत हा कोटा पूर्ण केला व लोखंडे यांच्यावर ३२० मतांच्या फरकाने विजय मिळवला. निकालानंतर आमदार अनुराधा चव्हाण, आमदार सतीश चव्हाण, आमदार नारायण कुचे, किशोर शितोळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी मतमोजणी केंद्रात धाव घेतली. सुहास शिरसाठ भाजप ४५५ गणेश लोखंडे उबाठा १३५ इसाक खान अपक्ष ३५ अवैध मते ५ एकूण मते ६३० Ãआमचे ४१९ चे संख्याबळ असताना ४५५ मते मिळाली. घोडेबाजाराचा आरोप करणाऱ्यांनी त्यांना एमआयएमची दुसऱ्या पसंतीची मते कशी मिळाली हे सांगावे. अतुल सावे, मंत्री भाजप Ãमहायुतीच्या नेत्यांचा विश्वास आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हा विजय मिळाला. सर्व मतदारांचे आभार. आता मतदारसंघाच्या विकासासाठी काम करणार आहे. सुहास शिरसाठ, विजयी उमेदवार Ãनिवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून आम्ही ताकदीने लढलो. आमच्या संख्याबळापेक्षा सहा सात मते जास्तच मिळाली. या निवडणुकीत भाजपने मोठा घोडेबाजार केला. गणेश लोखंडे, उमेदवार, मविआ



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *