Headlines

मंगळवेढ्यात आजपासून भक्तीचा जागर, कीर्तन, भारूड अन् पुष्पवृष्टी:संत चोखामेळा यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवेढ्यात कार्यक्रमांचे आयोजन



संत शिरोमणी चोखामेळा यांच्या ६८८ व्या स्मृतिदिनानिमित्त ५ ते ७ मे २०२६ या कालावधीत मंगळवेढ्यात विविध धार्मिक सांप्रदायिक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती समाधी मंदिर समितीचे अध्यक्ष जयराज शेंबडे यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली.

.

मंगळवार, दि. ५ मे २०२६ रोजी स. ९ वा.श्री संत दामाजी मंदिर ते संत शिरोमणी चोखोबा महाराज समाधी मंदिरापर्यंत दिंडी प्रदक्षिणा काढली जाणार असून यावेळी श्री गुरू ज्ञानोबाराय वारकरी शिक्षण संस्था, दादपूर चे बाल वारकरी मंडळ सहभागी होणार आहे.स. १० वा. “वीणापूजन “आ. समाधानदादा आवताडे, स.स.दाजी महाराज (तनाळी मठ) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.स. ११ ते दु. २ “संगीत भजन “हा कार्यक्रम होणार असून ,यामध्ये आसावरी महिला भजनी मंडळ, मंगळवेढा काशिविश्वेश्वर महिला भजनी मंडळ, मंगळवेढा यांचा सहभाग असणार आहे.

दु. २ ते सायं. ६ सामुहिक संगीत भजन करण्यात येणार असून यावेळी समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ, मंगळवेढा तालुका व शहर ह.भ.प.मल्लिकार्जुन राजमाने. ह.भ.प. गोपाळ कोकरे, ह.भ.प. मारूती भगत. ह.भ.प. अशोक गेजगे, ह.भ.प. पुंडलिक साठे. ह.भ.प. सिध्देश्वर कोळी. ह.भ.प. विठ्ठल जाधव. ह.भ.प.शंकर हजारे. ह.भ.प.तायाप्पा कोंडूभेरी. ह.भ.प. ज्ञानेश्वर भगरे, ह.भ.प. रूक्मिणी आसबे. ह.भ.प. रमेश माने.ह.भ.प. डॉ. तपिले. ह.भ.प.शिवाजी दोडके ह.भ.प.शिवाजी माने. ह.भ.प.तात्या आवताडे आदिजण उपस्थित राहणार आहेत. सायं. ८ ते रात्री १० ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, सोलापूर यांचे “कीर्तन” होणार आहे. बुधवार, दि. ६ मे २०२६ रोजी स. ९ वा.”संगीत भजन” हा कार्यक्रम होणार असून यावेळी श्रीराम महिला भजनी मंडळ, मंगळवेढा व अखिल भाविक भजनी मंडळ, मंगळवेढा श्री संत कान्होपात्रा महिला भजनी मंडळ, मंगळवेढा श्री संत मोहिनीबुवा भजनी मंडळ, मंगळवेढा सहभाग नोंदवणार आहेत.स. ११ ते सायं. ६ वाजेपर्यंत ह.भ.प. महादेव यादव व सहकारी, मारापूर “संगीत भजन “हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यावेळी ह.भ.प. सुभाष शिवशरण (तबला वादक), ह.भ.प. योगेंद्र महाराज, ह.भ.प. भिवा इंगळे, ह.भ.प. तेजस गांजाळे. ह.भ.प. अमित भोरे, ह.भ.प. राहुल गायकवाड, ह.भ.प. मस्तान मुल्ला, ह.भ.प. उमेश यादव (लबला वादक) यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.रात्री ८ वा.भारुड कार्यक्रम होणार असून स्व. बसवेश्वर उर्फ बंडोपंत बुरजे स्मरणार्थ नगरसेविका सीमाताई सोमनाथ बुरजे यांच्यावतीने भारूडकार : चंदाबाई तिवाडी (गोपाळपूर) यांच्या भारूडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

गुरुवारी महाभिषेक अन् महाप्रसाद गुरुवारी सकाळी ८ वाजता श्री संत शिरोमणी चोखोबा महाराज यांच्या समाधीस महाभिषेक नगराध्यक्ष सुनंदाताई आवताडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.११ वाजता ह.भ.प निवृत्ती महाराज रामदास पंढरपूर यांचे कीर्तन होणार असून, दुपारी १२ वाजता “पुष्पवृष्टी” करण्यात येणार आहे, तर दुपारी १ वाजता दलित मित्र स्व. बाबासाहेब धुळा साळे यांच्या स्मरणार्थ संत चोखोबा शिक्षण प्रसारक मंडळ हुन्नूर तथा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत पुंडलिक साळे यांच्या वतीने “महाप्रसादाचे वाटप” करण्यात येणार असून पुण्यतिथीची समाप्ती होणार आहे, तरी सर्व भक्तगणांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री संत चोखामेळा समाधी मंदिर मंगळवेढा यांच्यावतीने करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *