Headlines

मंत्रालयात नोकरी हुकली; काम शिकून उभारले बोगस भरती रॅकेट!:7 तरुणांना बोगस नियुक्तिपत्र, जे.जे.मध्ये मेडिकल करवून विश्वास देत दीड कोटी लुबाडले




मंत्रालयात नोकरीचे स्वप्न भंगल्यानंतर एका तरुणाने मंत्रालयात वारंवार जाऊन अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला. नंतर स्वत: मंत्रालयात अधिकारी असल्याचे भासवून बाहेर राज्यभर बेरोजगारांना बोगस नोकरीचे रॅकेट सुरू केले. मंत्रालयातील अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेले बोगस नियुक्तिपत्र देऊन तब्बल सात तरुणांची मुंबईतील जे.जे. हॉस्पिटल व राजावाडी या शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीही करून दिली. सात तरुणांकडून तब्बल दीड कोटी रुपये घेतले. मात्र, त्यांना नोकरी लावून दिली नाही. दरम्यान, दोघा बंधूंविरुद्ध जळगावसह राज्यभरात आठ ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. सध्या ते कारागृहात आहेत. माझा भाऊ बँकेत मोठ्या पदावर आहे व मी स्वतः मंत्रालयात अधिकारी असल्याचे सांगत स्वप्निल राजेंद्र जयस्वाल आणि अमित राजेंद्र जयस्वाल या दोघांनी एका महिला साथीदाराच्या मदतीने मे 2021 मध्ये काही तरुणांना बनावट शासकीय नियुक्तीचे पत्र दिले होते, त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी बनावट शासकीय पत्र देऊन मुंबईतील घाटकोपरच्या राजावाडी व जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणीदेखील करून घेतली. प्रत्यक्ष नियुक्तीबाबत विचारणा करणाऱ्या तरुणांना कधी कोरोना,कधी निवडणुकीचे कारण सांगितले. यापैकी काहींना मंत्रालयातील विविध अधिकाऱ्यांच्या दालनात फिरवून आणले, हॉटेलमध्येबोलावून समुपदेशनही केले. अनेक वर्षे या भावांच्या मागे फिरूनही नियुक्ती मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हे तरुण पुढे येत आहेत. आतापर्यंत 7 जणांनी तब्बल एकूण दीड कोटी रुपये दिले असल्याची बाब पुढे आली आहे. महागड्या हॉटेलात मुक्काम स्वप्निल नेहमी महागडा पेहराव करून नामांकित हॉटेल्स व कॅफेमध्ये बसायचा. तिथे येणाऱ्या तरुणांसमोर स्वतःहून बेरोजगारीचा विषय काढून मंत्रालयात लाइन असल्याचे सांगायचा. तरुण नोकरीसाठी तयार झाला की, गप्पांमधून त्याच्या आर्थिक परिस्थितीचा व खिशाचा अंदाज घ्यायचा. नोकरी लावून देण्याच्या बदल्यात लाखांची रक्कम ठरवली जायची. मोठा भाऊ अमित व त्याची कथित पत्नी स्वाती यांच्याशी भेट घडवून आणत, आपले कुटुंबच सधन असल्याचे भासवायचा. अवघ्या महिनाभरात व्हॉट्सॲपवर मंत्रालयाचे बनावट नियुक्ती आदेश व ओळखपत्रे पाठवायचा. गोपनीयतेच्या नावाखाली हॉटेल किंवा कॅफेतच खोट्या सर्व्हिस बुकात नोंदी करून काम झाले असे भासवायचा. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश वाघ हे करत आहेत. आलिशान गाडीवर शासकीय लोगो स्वप्निलने मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचे बनावट ओळखपत्र, नियुक्तिपत्र, सर्व्हिस बुक तयार करून घेतले. स्वत:च्या नावाचे तत्कालीन कक्षाधिकारी म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव व सही असलेला 2014चा नियुक्तीचा आदेश बनवून घेतला. शासकीय वेबसाइटवरून लोगोने ओळखपत्र बनवून घेतले. त्याच्या स्कोडा गाडीवरही शासनाची पाटी लावली. दोघांना 55.50 लाख रुपयांमध्ये फसवले जळगावातील हॉटेल व्यावसायिक कुणाल रवींद्र नाईक यांच्या दोन भावांना सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता म्हणून नोकरी लावून देण्यासाठी 55.50 लाख रुपये घेतले होते. अमित हा श्यामराव विठ्ठल बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून जळगाव, नंतर अकोला येथे नोकरीला होता. नियुक्ती नसल्याने फसवणूक झाल्यामुळे ते पोलिसांत गेले. तिघांच्या टोळीने अनेकांना फसवले… नाईक यांच्या दोन भावांना 55.50 लाखांत गंडवल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जळगावातील आणखी 5 तरुणांना फसवल्याचे उघड झाले. या टोळीने राज्यात जळगाव, अकोला, नाशिक व कल्याण या चार ठिकाणी अनेकांना गंडा घातला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *