![]()
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी एसआयआर (SIR) मोहिमेला गती देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यासमवेत कोथरुडमधील घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला. यावेळी नागरिकांकडून एसआयआर गणना फॉर्म स्वीकारण्यात आले आणि मोहिमेबाबत जनजागृतीही करण्यात आली. या भेटीदरम्यान मंत्री पाटील यांनी मतदारांना एसआयआर मोहिमेचे महत्त्व समजावून सांगितले. लोकशाहीसाठी प्रत्येक मतदाराची माहिती अचूक आणि अद्ययावत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे त्यांनी नमूद केले. मतदार यादी अधिक पारदर्शक, अचूक आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. चंद्रकांतदादा पाटील यांनी नागरिकांच्या शंकांचे निरसन केले. ज्यांनी अद्याप फॉर्म भरले नव्हते, त्यांना आवश्यक मार्गदर्शन करून फॉर्म भरून घेतले. तसेच, भरलेले फॉर्म तात्काळ स्वीकारून संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्याची प्रक्रियाही यावेळी पार पडली. “मतदार यादीतील अचूकता हा सशक्त लोकशाहीचा पाया आहे. प्रत्येक मतदाराचे नाव यादीत समाविष्ट असावे आणि कोणीही मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये,” असे आवाहन चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. निवडणूक आयोगाने या मोहिमेला ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली असून, प्रत्येक मतदाराने एसआयआर मोहिमेत सहभागी होऊन आपला फॉर्म वेळेत बीएलओंकडे जमा करावा, असेही ते म्हणाले. दादा जे. पी. वासवानी यांच्या १०८व्या जयंतीनिमित्त दीदी कृष्णा यांच्या हस्ते ‘पीस पोर्टल’चे लोकार्पण आध्यात्मिक गुरु दादा जे. पी. वासवानी यांच्या १०८व्या जयंतीनिमित्त दीदी कृष्णा यांच्या हस्ते ‘पीस पोर्टल’ या विनामूल्य डिजिटल व्यासपीठाचे लोकार्पण करण्यात आले. अवघ्या दोन मिनिटांत मनःशांती, भावनिक संतुलन आणि अंतर्मनातील स्थैर्य अनुभवण्यास मदत करणारे हे अभिनव व्यासपीठ सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. www.sadhuvaswani.org/peace-portal या संकेतस्थळावर उपलब्ध असलेले ‘पीस पोर्टल’ ताण, चिंता, राग, अपराधीपणाची भावना, एकाकीपणा आणि अति विचार यांसारख्या दैनंदिन भावनिक आव्हानांवर मात करण्यासाठी मार्गदर्शित दोन मिनिटांचे ‘रीसेट्स’ उपलब्ध करून देते. दादा जे. पी. वासवानी आणि दीदी कृष्णा यांच्या प्रेरणादायी संदेशांनी समृद्ध असलेले हे व्यासपीठ, कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणी काही क्षण थांबून स्वतःला नव्याने सावरण्याचा आणि अंतर्मनातील शांततेचा अनुभव घेण्याचा सहज, प्रभावी आणि व्यवहार्य मार्ग उपलब्ध करून देते.
Source link
मंत्री चंद्रकांत पाटलांकडून SIR मोहिमेला गती:बीएलओंसमवेत कोथरुडमध्ये घराघरांत जाऊन मतदारांशी साधला संवाद