Headlines

'मराठा समाजाचा कार्यक्रम, तुम्ही बसलात तर वाद होईल':अभिमन्यू पवारांच्या विधानावर मेधा कुलकर्णींचा संताप; भाजपमध्ये मराठा-ब्राह्मण वाद?




‘सारथी’ संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या यूपीएससी, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यातील नाराजीनाट्य समोर आले आहे. पहिल्या रांगेत बसण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर नाराज झालेल्या मेधा कुलकर्णी थेट मंचावरून निघून गेल्या होत्या. या संपूर्ण प्रकरणावर आमदार पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिल्यानंतर, मेधा कुलकर्णी यांनीही आपली भूमिका स्पष्ट करत, “मी अभिमन्यू पवार यांना माफ करते, मात्र त्यांनी आत्मपरीक्षण करावे,” असा सूचक सल्ला दिला आहे. खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांचे अभिनंदन करण्यासाठी चांगल्या मनःस्थितीत मी त्या कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रमात पहिल्या रांगेत काही रिकाम्या खुर्च्या होत्या. माधुरीताई किंवा अन्य मंत्रीमहोदय आलेले नव्हते त्यामुळे खुर्च्या रिकाम्या होत्या. अधिकारी म्हणत होते, जर त्या खुर्च्या रिकाम्या असतील तर मेधा कुलकर्णी यांचा प्रोटोकॉल आहे. माझ्याकडे एका कमिटीचे अध्यक्षपद आहे, म्हणून ते मला म्हणत होते इथे बसा, मी म्हणाले की नरेंद्र पाटीलही बसू शकतात, महामंडळाचे अध्यक्ष आहेत. जात बघून बसण्याची रचना केलेली नसते पुढे मेधा कुलकर्णी म्हणाल्या, अभिमन्यू पवारांना तिथे बसायचे होते, म्हणून धावाधाव चालली होती, मी बसतो तर अधिकारी म्हणाले की यांच्यानंतर मेधा कुलकर्णींचे नाव येते तर ते (अभिमन्यू पवार) असे म्हणाले की, हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे, तुम्ही इथे बसलात तर वाद होईल. हा कार्यक्रम नक्कीच अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या मराठा समाजातील कर्तृत्वान मराठा समाजातील मुलांचा आहे, त्यांना शाबासकी देण्याचा कार्यक्रम आहे. कार्यक्रम शासनाचा आहे, शासकीय प्रोटोकॉल नुसार खुर्च्यांची रचना केलेली असते. जात बघून रचना केलेली नसते. अभिमन्यू पवारांसाठी मी ब्राह्मण समाजात प्रचार केला मी कुठेही गेले तरी हिंदू म्हणून जगले पाहिजे, असे आवाहन करते जातीचा विषय आला कुठे? असा सवाल मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केला. त्या म्हणाल्या, अभिमन्यू पवार जेव्हा निवडणुकीला सामोरे जात होते, तेव्हा त्यांनी माझ्याकडे या ब्राह्मण समाजाचा मेळावा ठेवणार आहे, असे म्हटले. तब्येत ठीक नव्हती तरी लांबचा प्रवास करुन त्यांच्यासाठी गेले. ब्राह्मण समाजाला अभिन्यूजींच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. समाजाचा प्रश्न येत नाही, सगळ्यांनी विचारांच्या पाठीशी राहिले पाहिजे, असे आवाहन त्या कार्यक्रमात केले होते. मला सफोकेट झाले आणि मी निघाले आज देशात परिस्थिती वेगळी आहेत, आव्हाने वेगळी आहेत, प्रश्न वेगळी आहेत. ज्याला उत्तर देण्यासाठी हिंदू समाज येईल का हा मुद्दा आहे. एकमेकांच्या जाती काढून काय फायदा आहे. कार्यक्रम वेगळा चाललाय, तुम्ही कशावरुन बोलताय, मला सफोकेट झाले, मला चुकीचे वाटले, मी तिथून निघून आले, असे मेधा कुलकर्णींनी म्हटले. मुख्यमंत्र्यांनाही भेटू दिले नाही कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस लाऊंजमध्ये बसले होते. तिथे मराठा समाजातील बांधव माझ्यासोबत होते, त्यांना घेऊन गेले होते. अभिजीत पवार त्यांना आत घेऊ नका, असे म्हणत होते. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने बोलले, अभिमन्यूजी तुम्हाला ओएसडी समजता का?, असा सवाल मेधा कुलकर्णी यांनी केला. हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे, तुम्ही बसलात तर वाद होईल, याचा आणखी वेगळा कोणता मतितार्थ आहे हे सांगा, असा सवालही मेधा कुलकर्णी यांनी केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *