![]()
१८ जून रोजी १७ जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजप २०२० च्या तुलनेत मित्रपक्ष शिवसेना (शिंदेसेना) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तीन जागा खेचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात कदाचित जागांची
.
माध्यम प्रतिनिधींशी बोलताना फडणवीस म्हणाले की, आम्ही एकत्रित बसून यातून मार्ग काढू. अजून मार्ग निघाला नाही, पण मला विश्वास आहे की लवकरच मार्ग निघेल. विशेष म्हणजे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर मतदारसंघावर शिवसेनेने आपला दावा कायम ठेवला असून, पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष असल्याचे दिसते. तरीही मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले आहे.
जागावाटपाच्या फॉर्म्युल्यात भाजप १२ जागांवर लढणार
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, १७ जागांसाठी जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला असा: भाजप : १२ शिवसेना (शिंदेसेना): ०४ राष्ट्रवादी (अजित पवार गट): ०१ जागा
भाजपला अहिल्यानगर, सोलापूरच्या जागा हव्यात…
जळगाव : मंत्री गुलाबराव पाटील यांचा मुलगा इच्छुक. अमरावती : भाजपचे प्रवीण पोटे, काँग्रेसचे बबलू देशमुख आणि वीरेंद्र जगताप यांनी अर्ज नेले. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गवर राष्ट्रवादी तर शिवसेनेने हिंगोली-परभणीवर लक्ष केंद्रित केले आहे.
अजित पवारांचे पुत्र जय पवार लढणार नाहीत
जागा वाटपावर शिक्कामोर्तबासाठी लवकरच मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक होईल. हिंगोली-परभणी आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांवरूनही महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. पुण्यातून जय पवार यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, त्यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले.