Headlines

माढ्यात सुरक्षेचा बोजवारा:लोकवर्गणीतून बसवलेले 16 सीसीटीव्ही 2 वर्षांपासून बंद, घरफोडी, चोऱ्यांमध्ये वाढ; सीसीटीव्ही दुरुस्तीसाठी माढेकरांनी एकत्र येण्याची गरज‎


.

गुन्हेगारी क्षेत्रातील घटनांसह वाढत्या रोडरोमियोंवर वचक ठेवण्यासाठी मुख्य चौकासह रहदारीच्या सार्वजनिक ठिकाणी माढावासीयांच्या लोकवर्गणीतून बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे मागील २ वर्षांपासून बंदच स्थितीत असल्याने कॅमेरे तत्परतेने दुरूस्ती करून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

माढा पोलिस ठाण्याचे तात्कालीन सपोनि अतुल भोस यांच्या पुढाकारातून शहरवासियांनी दिलेल्या लोकवर्गणीतून २०१८ साली माढा शहरात १६ कॅमेऱ्यांद्वारे करडी नजर ठेवली होती. यामुळे बेकायदेशीर घटनांना लगाम लागला होता. शहरातील पतसंस्था, व्यापाऱ्यांसह दानशूर समाज मंडळासह, काही ठराविक नेते मंडळींनी लोकवर्गणीत हातभार लावला होता. या बसवलेल्या कॅमेऱ्यांचे अनेकदा दुरुस्तीचे कामही झाले होते. सध्या मागील २ वर्षांपासून हे सर्व भागातील कॅमेरे बंद डब्या समान शोभेच्या बाहुली समान उभे आहेत. याकडे मात्र संबंधित आलेल्या पोलीस अधिकारी अथवा नेते मंडळींसह शहरातील जाणकार मंडळीचे दुर्लक्ष झाल्याचे पहायला मिळत आहे. हे उदासिन धोरण बाजूला सारून शहराच्या सुरक्षिततेसाठी पुढे यायला हवे.

माढ्यातील दोघा तरुणांचे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भरसकाळी अपहरण करून त्यांना झालेली अमानुष मारहाणीची घटना तसेच छत्रपती शिवाजी महाराज नगरमधील शिक्षकाची झालेली घरफोडी, दिवसा मोटारसायकलच्या चोरीच्या घटना, बेशिस्त वाहतुक व्यवस्था (वाहतुक कोंडी), बेकायदेशीर व्यवसायाचे पेव-त्यांची होत असलेली वाहतुक या घटनांसह कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरु असणे ^अनेक दिवसांपासून कॅमेरे बंद स्थितीत आहेत, हे वास्तव आहे. मात्र हे कॅमेरे सुरु करण्यासाठी काय करता येईल, या संदर्भात आम्ही माहिती घेत आहोत. लोकवर्गणीतून बसवलेले हे कॅमेरे आहेत. प्रत्येकाने कॅमेरे पुन्हा सुरु करण्याकामी हातभार लावल्यास कॅमेरे सुरु व्हायला फार वेळ लागणार नाही. — रोहित शिंदे, सपोनि, माढा ^सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे शहराला आणि साहजिकच शहरवासीयांमध्ये सुरक्षिततेची भावना असते. घरफोडी- चोरीच्या घटनांना लगाम लावण्यासाठी हे फायदेशीर ठरते. कॅमेरे सुरु करण्यासाठी माढेकरांनी पुढे यायला हवे. — बाळासाहेब चवरे, नागरिक, माढा असणे आवश्यक आहे. यासाठी पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी, नागरिक, व्यापारी, दानशूर मंडळींनी पुढाकार घेऊन नादुरुस्त कॅमेरे पुन्हा सुरु करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. त्यासाठी गरज आहे प्रत्येकाने मदतीचा हातभार लावण्याची. तरच घटनांना प्रतिबंध बसेल.

प्रशासनाने काय करणे अपेक्षित . माढा पोलीस ठाण्याचे सपोनि यांनी बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत लोकप्रतिनिधी, व्यापारी, दानशूर मंडळींसह शहरवासीयांची बैठक घेऊन कॅमेरे सुरु करण्यासंदर्भात चर्चा विनिमय करावा. . कॅमेरे बसवण्याचे काम केलेल्या संबंधित ठेकेदारांना बोलावून घेऊन कॅमेरा आणि व्यवस्था पाहणी करून घेत अपेक्षित खर्च काढणे. . कॅमेरा बसवणारी कंपनी आणि नागरिकांची बैठक लावून कॅमेरे सुरु करण्यासाठी पोलीस प्रशासनाने लोकवर्गणीचा प्रस्ताव मांडायला हवा, असे प्रयत्न झाले तरच कॅमेरे सुरु व्हायला फार काळ वेळ लागणार नाही.

अनेक दिवसांपासून कॅमेरे बंद स्थितीत



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *