![]()
कुर्डुवाडी पंचायत समिती कृषी विभाग व माढा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘कृषी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित विशेष सोहळ्यात तालुक्यातील विविध पिकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ७ शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. कुर्डुवाडी पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसभापती प्रतिनिधी हनुमंत गिड्डे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी अविनाश चंदन, पंचायत समितीचे कृषी अधिकारी शंकर मिरगणे आणि रिपाई (आ) गटाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक चंद्रकांत वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उत्कृष्ट सूत्रसंचालन कृषी अधिकारी शंकर मिरगणे यांनी केले. या प्रसंगी कृषी अधिकारी निकत, गायत्री चव्हाण, आनंद झिने, अमृत ढवळे, धनंजय मिसाळ, अश्विनी नलगे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि माढा तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पीक स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान सौदागर मस्के (जिल्हास्तर प्रथम क्रमांक, मूग), रवी जगताप (जिल्हास्तर तृतीय क्रमांक, मका), कल्याण उमाटे (तालुकास्तर प्रथम क्रमांक, उडीद), संदीप पाटील (तालुकास्तर द्वितीय क्रमांक, उडीद), छाया पवार (तालुकास्तर तृतीय क्रमांक, उडीद), गणेश वाघ (तालुकास्तर प्रथम क्रमांक, तूर), शीतल उमाटे (तालुकास्तर द्वितीय क्रमांक, तूर).
Source link
माढा तालुक्यातील 7 शेतकऱ्यांचा गौरव:खरीप हंगाम 2025 मधील विजेत्यांना सन्मानचिन्ह