![]()
तलावात मासेमारीसाठी गेलेल्या एका ६० वर्षीय वृद्धाचा मासेमारीच्या जाळ्यात पाय अडकल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना वैजापूर तालुक्यातील भटाणा येथे शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. रहीम युसूफ शेख (६०, रा. भटाणा) असे मृताचे नाव आहे. रहीम शेख हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मासेमारीचा व्यवसाय करत होते. शुक्रवारी सकाळी ते भटाणा तलावावर मासे पकडण्यासाठी गेले. मासे पकडण्यासाठी त्यांनी तलावात जाळे टाकले असता, अचानक त्यांचा पाय जाळ्यात अडकला. स्वत:ला सोडवण्याच्या प्रयत्नात त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि हातपाय हलवता न आल्याने त्यांचा जागीच बुडून मृत्यू झाला. शिऊर ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव रणखांब यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. रहीम शेख यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.
Source link
मासेमारीसाठी गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू:भटाणा तलावातील मासेमारीच्या जाळ्यात पाय अडकल्याने घडली दुर्घटना