![]()
ऐतिहासिक देवगिरी किल्ला परिसरात बिबट्याचा वावर असल्याने पर्यटक, पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी आणि स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अखेर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी (१२ जुलै) मध्यरात्रीनंतर वाजण्याच्या सुमारास बिबट्याचा एक बछडा जेरबंद झाला. त्यानंतर आता दुसरा बछडा व बिबट्या यांना पकडण्यासाठी २ स्वतंत्र पिंजरे लावण्यात आले आहेत. गेल्या सुमारे ६ महिन्यांपासून किल्ला परिसरात ३ ते ४ बिबट्यांचा वावर आहे. त्यामध्ये २ बछडे आहेत. त्यांना पकडण्यासाठी ११ जुलै रोजी वन विभागाने पिंजरा लावला. त्यात बिबट्याचा बछडा अडकल्यानंतर त्याची मादी पिंजऱ्याजवळच बराच वेळ घुटमळत होती. पिल्लापासून दूर झाल्याने ती अस्वस्थ झाली होती आणि वारंवार डरकाळ्या फोडत होती. सोमवारी सकाळपासून किल्ला परिसरात व्यापक सर्च ऑपरेशन हाती घेण्यात आले आहे. ४ दिवसांपासून वन विभागाच्या २ रेस्क्यू टीम तैनात आहेत. पिंजऱ्यात शिकारीसाठी बकरी व कोंबड्या ठेवण्यात आल्या आहेत. किल्ला परिसरात ड्रोनद्वारे सर्च ऑपरेशन अद्याप सुरू आहे. हे ऑपरेशन उपवनसहायक सुवर्णा माने, सहायक वन विभाग अधिकारी आशा चव्हाण, निखिल देशमुख यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.
Source link
मिनार परिसरात बिबट्या बछड्यासाठी दोन पिंजरे:देवगिरी किल्ला परिसरात 2 पथकांकडून शोध