Headlines

यूपीआयमुळे व्यवहार पारदर्शक- फडणवीस:यूपीआय संदर्भातील गैरसमजांमुळे पेट्रोलपंप चालकांचा विरोध अयोग्य




यूपीआय व्यवहाराबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवा व गैरसमजांमुळे पेट्रोलपंप चालकांनी विरोधाची भूमिका घेणे योग्य नाही. युपीआयमुळे व्यवसाय वाढला असून व्यवहार अधिक पारदर्शक झाले आहेत. देशातील व्यापार वाढवणे आणि भ्रष्टाचार कमी करण्यात डिजिटल व्यवहारांचे मोठे योगदान असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शुल्काबाबत गैरसमज पसरवले जात आहेत. सर्वच व्यवहारांवर शुल्क नसून ते काही विशिष्ट व्यवहारांवरच लागू आहे. देशाला पुढे न्यायचे असेल, तर अतिशय नाममात्र शुल्काचा भार उचलावा लागेल.” चिदंबरम समितीत मग विरोध कशाला? यूपीआयच्या शाश्वत व्यवस्थेसाठी संसदीय स्थायी समितीने महसूल मॉडेलची शिफारस केली होती. या समितीत काँग्रेसचे पी. चिदंबरम, मनिष तिवारी यांच्यासह पाच खासदार होते. १२ ऑगस्ट रोजी समितीचा अहवाल स्वीकारताना कोणताही औपचारिक विरोध झाला नव्हता, याकडे सरकारी पक्षाने लक्ष वेधले आहे. मात्र, काँग्रेस सदस्यांनी यावर प्रतिवाद करत, सध्या जाहीर केलेल्या विशिष्ट शुल्क प्रस्तावावर समितीत चर्चा झाली नव्हती, असा दावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल व्यवहारांच्या व्यापक फायद्यांवर भर देत, नकारात्मक वातावरण निर्माण करण्याऐवजी या व्यवस्थेचे महत्त्व समजून घेण्याचे आवाहनही या वेळी बोलताना केले. राहुल गांधींना स्टँड-अप कॉमेडीत रोजगार मिळेल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केलेल्या मिमिक्रीवरून फडणवीस यांनी त्यांच्यावरही टीका केली. ‘राहुल गांधींकडे आता हेच काम शिल्लक राहिले आहे. त्यांनी पक्ष सोडून स्टँड-अप कॉमेडियनचे काम हाती घेतले, तर त्यांना चांगला रोजगार मिळू शकतो,’ असा टोला त्यांनी लगावला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *