![]()
राज्यात पावसाने पुन्हा एकदा रौद्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. गुजरातपासून ते थेट कर्नाटकपर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील मान्सून अधिकच सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील २ ते ३ दिवस पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे. पुणे आणि साताऱ्यातील घाटमाथा परिसर तसेच संपूर्ण कोकण किनारपट्टीवर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसासाठी पोषक वातावरण हवामान खात्याच्या माहितीनुसार, सध्या मान्सूनचा पट्टा मध्य प्रदेशातील गुना, सिधी येथून थेट ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय झाला आहे. याशिवाय गुजरात ते कर्नाटक या पट्ट्यात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या दोन प्रमुख हवामान प्रणालींमुळे अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वारे राज्याकडे वेगाने खेचले जात आहेत. याचा थेट परिणाम म्हणून महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढल्याचे चित्र आहे. पुणे आणि साताऱ्यात धोक्याचा इशारा सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचा सर्वात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाट परिसरासाठी अतिमुसळधार पावसाचा विशेष अलर्ट जारी केला आहे. या भागात नद्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ होणे, दरडी कोसळणे यांसारख्या घटना घडू शकतात, त्यामुळे प्रशासनाने आणि नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. मुंबई आणि कोकणासाठी ‘यलो अलर्ट’ कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांनाही पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. आयएमडीने पुढील काही दिवसांसाठी खालील जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ दिला आहे: उत्तर कोकणात अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता उत्तर कोकणातील काही भागांत पावसाचा जोर सर्वाधिक असणार आहे. येथे मुसळधार ते अति मुसळधार आणि काही तुरळक ठिकाणी तर अत्यंत मुसळधार पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर, दक्षिण कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्येही काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोसळू शकतो, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. संबंधित बातमी वाचा.. एमपी- यूपीसह 5 राज्यांना पावसाचा अलर्ट:गुजरातमध्ये नद्यांना पूर, आसाममध्ये 61 मृत्यू; अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू उत्तर भारतात पावसाचा जोर कायम आहे. 5 राज्यांमध्ये सामान्य ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेशात मान्सूनची मजबूत प्रणाली सक्रिय आहे. त्यामुळे आज राज्यातील 35 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, उत्तर प्रदेशात गेल्या 15 दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. यामुळे शनिवारी राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. गुजरातमध्ये सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्हे पुराच्या विळख्यात आहेत. आतापर्यंत 40,500 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पावसाशी संबंधित अपघातांमध्ये 5 लोकांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादमध्ये आज सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाडी केंद्रे बंद राहतील. सविस्तर वाचा
Source link
राज्याला पुन्हा झोडपणार:गुजरात ते कर्नाटक कमी दाबाचा पट्टा सक्रिय; मुंबई, कोकण अन् कोल्हापूरला यलो अलर्ट