![]()
श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलमार्फत आयोजित राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात झाली. साईबाबांचे जीवनचरित्र, त्यांची शिकवण, सेवाभाव आणि मानवतेचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीची आवड निर्माण करून उत्कृष्ट वक्ते घडवणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. या स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, प्रभारी प्रशासकीय अधिकारी अतुल वाघ तसेच शैक्षणिक संकुलातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन राजेंद्र कोहोकडे यांनी केले. इयत्ता ५ वी ते ७ वी (लहान गट) आणि इयत्ता ८ वी ते १० वी (मोठा गट) अशा दोन गटांत झालेल्या या स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लहान गटात ७१ तर मोठ्या गटात ७६ संघांनी सहभाग नोंदविला. दोन्ही गटांतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ८ हजार रुपये, तृतीय क्रमांकास ५ हजार रुपये आणि उत्तेजनार्थ १ हजार रुपये रोख, श्री साईचरित्र ग्रंथ, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. दोन्ही गटांतील विजेत्यांना खालीलप्रमाणे पुरस्कार, श्री साईचरित्र ग्रंथ, चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले: स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे: १. लहान गट (इयत्ता ५ वी ते ७ वी): प्रथम: विधी विनोद माळोदे व धनश्री जगन जायभाय (सहकार विद्यामंदिर, बिबी, ता. लोणार, जि. बुलढाणा), द्वितीय: वेदश्री अमोल शेळके व जयश्री सचिन छल्लारे (जेटाभाई ठाकरशी सोमैया हायस्कूल, बेलापूर, ता. श्रीरामपूर), तृतीय: स्वारा नितीन पावसे व ईश्वरी जनार्दन वाणी (श्री साईबाबा कन्या विद्यामंदिर, शिर्डी), उत्तेजनार्थ: साईशा गोरख सोनवणे व वैष्णव सत्यवान ननिमसे (ओम गुरुदेव सेमी गुरुकुल, कोकमठाण) २. मोठा गट (इयत्ता ८ वी ते १० वी): प्रथम: आरोही गणेश सुपेकर व नमिता मंगेश सांगळे (श्री दिगंबर गणेश सराफ विद्यालय, संगमनेर), द्वितीय: अंजली नंदकिशोर औताडे व माहेश्वरी गणेश शेलार (डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यामंदिर, कोपरगाव), तृतीय: सृष्टी अंकुश राठोड व काव्यांजली मंगेश कासार (श्री साईनिर्माण इंग्लिश मिडीयम स्कूल, शिर्डी), उत्तेजनार्थ: पलक प्रसाद उदावंत व उन्नती राजेंद्र खंडीझोड (सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूल, कोपरगाव)
Source link
राज्य वक्तृत्व स्पर्धेत संगमनेर, बुलढाण्याच्या विद्यार्थ्यांचे यश:विजेत्यांना 11 हजारांचे पारितोषिक