Headlines

मोराणे सांडस शाळेत एकच शिक्षक;‎ 50 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान‎:शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे पालकांमध्ये चिंता; त्वरित नियुक्ती करण्याची मागणी‎



नामपूर मोराणे सांडस (ता. बागलाण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षकांच्या कमतरतेमुळे गंभीर अडचणीत सापडली आहे. सध्या ५० हून अधिक विद्यार्थ्यांची पटसंख्या असलेल्या या शाळेतील शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी केवळ एका शिक्षकावर आहे. विशेष म्हणजे, हे शिक्

.

परिणामी, विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत असून, अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना अन्य शाळांमध्ये प्रवेश दिल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. शिक्षकांची कमतरता कायम राहिल्यास मराठी शाळांवरील पालकांचा विश्वास आणखी कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणे अत्यंत आवश्यक असताना शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे त्यांचे शिक्षणच संकटात आले आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक जिल्हा

मोराणे सांडस जिल्हा परिषद शाळेत सध्या ४८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेसाठी अतिरिक्त शिक्षक नियुक्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. सध्या शिक्षकांची नेमणूक मतदार यादी अद्ययावत करणे व मतदार माहिती संकलनाच्या कामासाठी असल्याने नियुक्तीत विलंब झाला आहे. संबंधित प्रक्रिया पूर्ण होताच शाळेला अतिरिक्त शिक्षक उपलब्ध करून दिले जातील. – चित्रा देवरे, शिक्षण विस्तार, अधिकारी,

बागलाण परिषद शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने या शाळेत कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती करावी. दोन दिवसांत शिक्षक उपलब्ध न झाल्यास शाळेला कुलूप ठोकून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *