Headlines

YCIS विद्यार्थिनी मृत्यू प्रकरण:हॉस्टेल प्रशासनाच्या जाचाला कंटाळून तरुणीची आत्महत्या, शौचालय खराब असल्याची केली होती तक्रार




सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या (वायसीआयएस) लेडीज हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाला आता गंभीर वळण लागले असून, विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी हॉस्टेलच्या रेक्टर, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि हॉस्टेल कमिटीच्या सदस्यांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर विद्यार्थिनीने 2 सप्टेंबर 2026 रोजी आत्महत्या केली होती. हॉस्टेलमधील शौचालयातील गैरसोयींबाबत तिने तक्रार करत या समस्येचा व्हिडिओ काढला होता. याच कारणावरून रेक्टर जयश्री जकाते आणि हॉस्टेल कमिटीच्या सदस्यांकडून तिला मानसिक त्रास देऊन महाविद्यालयातून काढून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याच मानसिक दबावाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलले, तसेच प्राचार्य सुरेश साळुंखे यांनीही याकडे वेळीच लक्ष न दिल्याने त्यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला आहे. अभाविपचे आंदोलन या दुर्दैवी घटनेनंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) महाविद्यालयाच्या पायऱ्यांवर बसून तीव्र आंदोलन केले. प्रशासन आणि हॉस्टेल कमिटीच्या जाचाला कंटाळूनच विद्यार्थिनीला हा निर्णय घ्यावा लागल्याचा आरोप करत, जबाबदार प्राचार्य आणि समितीवर तत्काळ निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी लावून धरली. तसेच मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणीही करण्यात आली होती. प्राचार्यांकडून आरोपांचे खंडन या घटनेनंतर महाविद्यालयात कोणतेही रॅगिंग किंवा छळ झाला नसल्याचा दावा करत प्राचार्य सुरेश साळुंखे यांनी सुरुवातीला सर्व आरोप फेटाळून लावले होते. पोलीस तपासाअंतीच विद्यार्थिनीच्या आत्महत्येचे नेमके कारण समोर येईल, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. मात्र, आता थेट प्राचार्य, रेक्टर आणि कमिटी सदस्यांवरच गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. पोलिसांचा सखोल तपास सुरू सातारा शहर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाला वेग दिला आहे. विद्यार्थिनीवर नेमका कोणत्या प्रकारचा दबाव टाकण्यात आला होता, तिला कोणी धमकावले आणि या आत्महत्येला प्रत्यक्ष कोण जबाबदार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांकडून आता सखोल चौकशी केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *