Headlines

लोडशेडिंग विरोधात 1 मे रोजी बोंबाबोंब:शेतकरी आक्रमक,‎आंदोलनाचा इशारा‎, सकारात्मक मार्ग‎काढण्याचा प्रयत्न‎‎




पंढरपूर उन्हाळ्याच्या तीव्र झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना लोडशेडिंगमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. सकाळी आणि संध्याकाळी होणारे हे लोडशेडिंग तात्काळ बंद न झाल्यास, १ मे रोजी भाळवणी वीज वितरण कार्यालयासमोर सर्व शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र ””बोंबाबोंब आंदोलन”” छेडले जाईल, असा ठाम इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी दिला आहे. भाळवणी व गार्डी सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाड्या-वस्त्यांवरील शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत शाखा अभियंता एन. एम. मिले यांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले. सध्या संध्याकाळच्या वेळी विद्यार्थी अभ्यास करत असतात. नेमक्या याच वेळी वीज खंडित होत असल्याने त्यांच्या अभ्यासात व्यत्यय येत असून शैक्षणिक नुकसान होत आहे. जनावरांची देखभाल, दूध काढणी आणि घरातील इतर कामांसाठी संध्याकाळची वेळ महत्त्वाची असते. वीज नसल्याने ही कामे रखडत असून शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. यावेळी विष्णू लोखंडे, राहुल हदगिने, माणिक लोखंडे, दीपक उमडाळे, दत्तात्रय सुतार, भीमराव सुरपुसे, शिवाजी लोखंडे, हणमंत पिसे, अशोक सदलगे,अनिल सुतार यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या भावना वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तातडीने पोहोचवण्यात येतील. भाळवणी गावठाण हद्दीतील सकाळचे लोडशेडिंग त्वरित बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विजेचा लोड २५ अँपिअरच्या वर गेल्यास वीज खंडित करण्याचे आदेश वरिष्ठांकडून आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जातील. एन. एम. मिले, शाखा अभियंता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *