Headlines

वंचित बहुजन आघाडीचा आज 'महाराष्ट्र बंद':कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटिसा, जबरदस्ती केल्यास कारवाईचा इशारा




नवी दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राज्यभरात, विशेषतः मुंबईत पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंददरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच जबरदस्तीने दुकाने किंवा व्यवहार बंद पाडले जाऊ नयेत, यासाठी पोलिसांनी ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत. शांतता भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. कार्यकर्त्यांना इशारा आणि कडक बंदोबस्त ‘वंचित’ने पुकारलेल्या या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिस प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. मुंबई पोलिसांनी संवेदनशील भागात सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. बंद नेमका कशासाठी? प्रकाश आंबेडकरांची भूमिका दिल्लीत आपल्या न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या कारवाईच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. दोन दिवसांपूर्वी या बंदची घोषणा करताना प्रकाश आंबेडकर यांनी सरकार आणि पोलिसांवर अत्यंत सडकून टीका केली होती. ते म्हणाले, “दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर छर्रे वापरले. युनायटेड नेशन्सने बंदी घातलेली असतानाही हा प्रकार घडतोय. पाण्याचे फवारे आणि विद्यार्थ्यांवरील हा अमानुष लाठीचार्ज पाहता, जालियनवाला बागेचा ‘जनरल डायर’ पुन्हा जन्माला आलाय की काय? असे वाटू लागले आहे.” “जनतेला अशिक्षित ठेवून सत्ता टिकवण्याचा सरकारचा डाव” परीक्षांमधील घोटाळे आणि शैक्षणिक व्यवस्थेवर बोट ठेवत प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “ज्या प्रकारे परीक्षांमध्ये घोटाळे होत आहेत, त्यावरून तरुणांची विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता खुंटवण्याचे काम सुरू असल्याचे दिसते. जनतेला अशिक्षित ठेवायचे, जेणेकरून आपली सत्ता कायम राहील, हेच सरकारचे धोरण आहे. देशात हुकूमशाही येऊ लागली असून सर्व राजकीय पक्ष मोडकळीस काढले जात आहेत,” असा घणाघात त्यांनी केला. अशा गंभीर परिस्थितीत सामान्य माणसाने गप्प न बसता रस्त्यावर उतरून आपले मत आणि भूमिका मांडली पाहिजे, असे आवाहन करत आजच्या २३ जुलैच्या बंदमध्ये सामान्य माणूस नक्की सहभागी होईल, असा विश्वास ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. हेही वाचा.. जंतर-मंतरवर पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष:CJP समर्थकांनी दगडफेक केली, ACP जखमी; पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे फेकले; 16 मेट्रो स्टेशन बंद दिल्लीतील जंतर-मंतरजवळ बुधवारी रात्री 8:30 च्या सुमारास विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, कनॉट प्लेस येथील टॉल्स्टॉय मार्गाजवळ काही उपद्रवींनी पोलिसांवर दगड आणि बाटल्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एसीपी कनॉट प्लेस विवेक भगत जखमी झाले. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे फेकले. घटनेशी संबंधित काही व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले. ज्यात आंदोलकांच्या हातात लाठ्याही दिसत आहेत. ते पोलिसांवर हल्ला करत आहेत. ही झटापट सुमारे 15 मिनिटे चालली. त्यानंतर परिस्थिती सामान्य आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *