Headlines

वादळाने उद‌्ध्वस्त झाली पपईची बाग:कांदा पिक अन् पोल्ट्री फार्ममधील अंडी, चांदवड तालुक्याच्या पूर्व भागात जाेरदार पावसाचा तडा‌खा‎




तालुक्याच्या दक्षिण-पूर्व भागातील गावांना रविवारी (दि. ७) सायंकाळी झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका बसला. शेतकरी, पशुपालक आणि पोल्ट्री व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी सोलर प्रकल्प, वीज यंत्रणा आणि शेतीपिकांचेही नुकसान झाले आहे. वडगाव पंगू येथे झाड कोसळून एका गायीचा मृत्यू झाला. वडगाव पंगू, वागदर्डी, रापली, कातरवाडी, रायपूर, भडाणे आदी गावांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट झाली. वडगाव पंगू येथील भाऊराव भीमराव पगार यांच्या गायीवर झाड कोसळल्याने ती जागीच दगावली. गणेश दिनकर चव्हाण यांचा उन्हाळी कांदा भिजून नुकसान झाले. सतीश सोमनाथ चव्हाण यांच्या शेतातील ट्रान्सफार्मर कोसळला. कातरवाडी येथील अतुल लहानू सोनवणे तसेच वडगाव येथील बबन आबासाहेब चव्हाण, सुनील आबासाहेब चव्हाण आणि आशाबाई मोठाभाऊ जाधव यांच्या सोलर प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले. सीमा यास्मिन मिरकासीम अली आणि सचिन अनिल गांगुर्डे यांच्या पोल्ट्री फार्मनाही फटका बसला. वादळामुळे वडगाव, कातरवाडी आणि रापली परिसरातील वीजखांब व ट्रान्सफार्मर कोसळून वीजपुरवठा खंडित झाला. तसेच मनमाड-नाशिक-मुंबई रेल्वेमार्गावर झाडे कोसळल्याने सुमारे तासभर रेल्वे वाहतूक ठप्प झाली. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करावेत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अवकाळी पाऊस आणि वादळानंतर नुकसानग्रस्त शेतकरी, पशुपालक व पोल्ट्री व्यावसायिकांसाठी तातडीचे पंचनामे महत्त्वाचे ठरतात. अनेकदा पंचनामे आणि मदत जाहीर होण्यास विलंब झाल्याने नुकसानग्रस्तांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. सोलर प्रकल्प, पशुधन आणि पोल्ट्री फार्मच्या नुकसानीसाठीही स्वतंत्र मदतीची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाची त्वरित कार्यवाही आणि मदतीचे वितरण याकडे आता परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *