Headlines

ना देशात गृहमंत्री, ना महाराष्ट्रात:आंदोलक मुलींवरील लाठीचार्जप्रकरणी अमित शहांनी राजीनामा द्यावा- उद्धव ठाकरे




नीट पेपरफुटीसाठी प्रधान यांचा राजीनामा मागितला तर दिल्ली आंदोलनादरम्यान मुलींवर विचित्र पद्धतीने लाठीचार्ज करण्यात आला त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घेतला पाहिजे. या आंदोलनावेळी गृहमंत्री कुठे दिसले का? महाराष्ट्रात आणि देशात गृहमंत्रीच नाहीत, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकार चालवता येत नाही अशा लोकांकडे सध्या सत्ता आहे, हे देशाचे दुर्दैव आहे, त्याविरोधात जनता पेटली आहे. हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. 2014 पासून ज्या लोकांना पाठिंबा दिला त्याच सरकारने पाठीत वार केल्याची भावना जनतेच्या मनात आहे. प्रत्येक ठिकाणी महागाई वाढत आहे, पेट्रोलचे भाव वाढले आहेत त्यामध्ये भेसळ होत आहे. बेरोजगारी वाढली आहे. पेपर, पक्ष फोडले जात आहेत. तर दान पेट्यामध्ये चोरी केली जात आहे, असे त्यांनी दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

हे वृत्त आम्ही अपडेट करत आहोत….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *