Headlines

चिपोली ग्रामसभेच्या सीएफआर क्षेत्रात श्रमदानामधून 5 हजार वृक्षलागवड:सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला उपस्थितीत‎



मेळघाटातील जंगल संवर्धन आणि सामूहिक वन हक्क (सीएफआर) क्षेत्राच्या संरक्षणासाठी चिपोली ग्रामसभेने श्रमदानातून सुमारे ५ हजार वृक्षलागवडीचा उपक्रम राबवला. ग्रामस्थांच्या सामूहिक सहभागातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ग्रामसभेच्या पुढाकारातून जंगल सं

.

या वृक्षलागवड उपक्रमादरम्यान धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी चिपोली गावाला भेट दिली. त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून सीएफआर क्षेत्राचे संरक्षण, संवर्धन आणि व्यवस्थापन याबाबत चर्चा केली. यावेळी शुक्ला यांनी ग्रामस्थांच्या एकजुटीचे कौतुक करत ग्रामसभेच्या माध्यमातून सामूहिक सहभागाने अशा प्रकारचे अधिकाधिक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. धारणी आणि चिखलदरा तालुक्यात अनेक गावांना सामूहिक वन हक्क प्राप्त झाले असून, त्या गावांनीही चिपोली ग्रामसभेच्या धर्तीवर आपल्या सीएफआर क्षेत्राच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी ग्रामस्थांनी पारंपरिक कोरकू ब्रीदवाक्य “डोंगर टाका मका, ढा टाका! ढा टाका मका, आबुंन टाका” असा सामूहिक जयघोष करत आपल्या जंगल आणि निसर्ग संवर्धनाच्या बांधिलकीचा आवाज बुलंद केला.यानंतर शुक्ला यांनी गावातील शाळा व अंगणवाडीला भेट देऊन पाहणी केली. विद्यार्थ्यांचे शिक्षण, अंगणवाडीतील सुविधा आणि स्थानिक पातळीवरील विविध प्रश्नांबाबत त्यांनी संबंधितांशी चर्चा केली. ग्रामस्थांनी सामूहिक वन हक्कातून प्राप्त जंगलाचे संरक्षण, संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्यासोबतच पुढील पिढ्यांसाठी या वनसंपदेचे जतन करण्याचा सामूहिक संकल्प व्यक्त केला. यामुळे हा उपक्रम उत्साहात पार पडला. यादरम्यान मान्यवरांकडून सहभागी नागरिकांचे कौतूक करण्यात आले.

मेळघाटात शिक्षण गरजेचे; गुणवत्तेला मिळेल चालना जंगल संवर्धनासोबतच शिक्षणाला प्राधान्य देणे, मेळघाट कुपोषणमुक्त आणि बालविवाहमुक्त करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी स्वतः वृक्षलागवड करून ग्रामस्थांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. समाज प्रगती सहयोग (एसपीएस) ने वृक्षलागवडीसाठी सोसोखेडा नर्सरीमधून रोपे उपलब्ध करून दिली. तसेच एसपीएसच्या टीमनेही वृक्षलागवड उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *