Headlines

Suraj Pancholi Statement on CBI Probe & Disha Saliyan Case


दिवंगत दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची सूत्रे सीबीआयकडे (CBI) गेल्यानंतर या प्रकरणाला पुन्हा एकदा नवे वळण मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सीबीआयने दाखल केलेल्या प्राथमिक चौकशीत बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील नावांची चर्चा पुन्हा सुरू झ

.

सूरज पांचोलीने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये नेमके काय म्हटले?

दिशा सालियान प्रकरणाशी स्वतःचा काडीमात्र संबंध नसल्याचे स्पष्ट करताना सूरज पांचोलीने अत्यंत उद्विग्न भावना व्यक्त केल्या आहेत. “गेल्या अनेक वर्षांपासून विविध मीडिया रिपोर्ट्स आणि निवेदनांमधून माझे नाव दिवंगत दिशा सालियान यांच्या दुर्दैवी मृत्यूशी जोडले जात आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, मी माझ्या संपूर्ण आयुष्यात दिशा सालियान यांना कधीही भेटलेलो नाही, तसेच माझा त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्कही नव्हता. इतकेच नव्हे, तर मी आजतागायत कधीही आदित्य ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटलेलो नाही,” असा स्पष्ट खुलासा सूरजने केला.

विनापुरावा बदनामी आणि मानसिक त्रास

“ज्या प्रकरणाशी माझा दूरदूरपर्यंत संबंध सिद्ध करणारा एकही पुरावा उपलब्ध नाही, त्या प्रकरणात केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी माझे नाव गोवणे अत्यंत चुकीचे आणि मानसिक त्रास देणारे आहे. मी याआधी प्रत्येक अफवेवर किंवा बातमीवर स्पष्टीकरण देणे टाळत होतो; पण आता सतत हेच घडत असल्याने समोर येऊन सत्य सांगणे भाग पडले आहे,” असे त्याने नमूद केले.

सीबीआय चौकशीला पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य

सूरजने पुढे स्पष्ट केले की, याआधीही तपास यंत्रणांनी त्याचे जबाब नोंदवून वस्तुस्थिती तपासली आहे. जर गरज पडली, तर भविष्यातही तो कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास आणि यंत्रणांना १०० टक्के सहकार्य करण्यास तयार आहे. दिशा सालियान यांच्या दुर्दैवी मृत्यूची निष्पक्ष, सविस्तर आणि पारदर्शक सीबीआय चौकशी व्हावी, याला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचेही त्याने जाहीर केले.

नेमकं काय आहे दिशा सालियान प्रकरण?

दिशा सालियान या अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या माजी व्यवस्थापक होत्या. 2020 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर या घटनेभोवती विविध प्रकारच्या चर्चा आणि दावे सुरू झाले. त्यानंतर काही काळात दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूच्या घटनांचा परस्पर संबंध असल्याचे दावेही सार्वजनिक चर्चेत आले. या प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणातही आरोप-प्रत्यारोप झाले. विविध राजकीय नेत्यांची नावे आणि आरोप चर्चेत आल्यामुळे या प्रकरणाला मोठे राजकीय वळण मिळाले. मात्र, या प्रकरणाशी संबंधित अनेक दावे आणि आरोप सार्वजनिक पातळीवर चर्चिले गेले असले तरी प्रत्येक दाव्याची सत्यता तपास यंत्रणांच्या तपासातून स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे.

सीबीआय चौकशीमुळे प्रकरण पुन्हा चर्चेत

दिशा सालियान यांच्या मृत्यूच्या प्रकरणात तपासाच्या मागणीवरून यापूर्वीही राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते. आता प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे गेल्यानंतर पुन्हा एकदा या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सीबीआयच्या तपासादरम्यान कोणते पुरावे समोर येतात, कोणाची चौकशी होते आणि या प्रकरणातील मृत्यूबाबत नेमकी वस्तुस्थिती काय आहे, हे पुढील तपासातून स्पष्ट होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सूरज पांचोलीची भूमिका महत्त्वाची ठरते. गेल्या काही वर्षांपासून आपले नाव या प्रकरणाशी जोडले जात असताना शांत राहिल्यानंतर आता त्याने थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली बाजू मांडली आहे.

हेही वाचा…

दिशा सालियन प्रकरणात ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होईल: बावनकुळेंचा विश्वास, समान नागरी कायद्यावरून विरोधकांवर साधला निशाणा

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिशा सालियन प्रकरण, समान नागरी कायदा (UCC) आणि राज्यातील दुष्काळ या मुद्द्यांवर सरकारची भूमिका स्पष्ट केली. “दिशा सालियन प्रकरणात सीबीआय चौकशीतून ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होईल,” असा विश्वास व्यक्त करतानाच त्यांनी समान नागरी कायद्यावरून विरोधकांवर सडकून टीका केली. तसेच, राज्यातील १८ दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा अहवाल आज कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांना सादर करणार असल्याची महत्त्वपूर्ण माहितीही त्यांनी दिली. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.