Headlines

रेकॉर्डवरील आरोपीकडून पिस्तुल, जिवंत काडतूस जप्त:सिंहगड रोड पोलिसांनी सिद्धेश पवारला केली अटक; आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल




गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सिंहगड रोड पोलिसांनी कारवाई केली. गस्त घालत असताना पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपी सिद्धेश सुरेश पवारला (वय ३१, रा. विश्रांतिनगर, हिंगणे खुर्द, पुणे) अटक केली. त्याच्याकडून गावठी पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक भूपेश साळुंके आणि त्यांचे कर्मचारी गस्त घालत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार प्रफुल्ल चव्हाण आणि युवराज कांबळे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली. विश्रांतिनगरकडून जनता वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर, शंकर मंदिराजवळ, हिंगणे खुर्द परिसरात एक व्यक्ती शस्त्र घेऊन थांबला होता. त्याने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि पांढऱ्या रंगाची पँट घातली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहितीची खातरजमा झाल्यावर कारवाईचे आदेश मिळाले. त्यानंतर पोलिस पथकाने लगेच घटनास्थळी धाव घेतली. तिथे वर्णनाशी जुळणारा एक व्यक्ती दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली. त्याच्याकडून अंदाजे ४० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात आर्म्स ॲक्ट कलम ३(२५) आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७(१), १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भूपेश साळुंके करत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर आणि गुन्हे निरीक्षक समीर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत पोलिस अंमलदार उत्तम तारू, तानाजी सागर, आण्णा केकाण, सतीश मोरे, विकास बांदल, राहुल ओलेकर, सागर शेडगे, विनायक मोहिते आणि शिरीष गावडे यांचा समावेश होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *