Headlines

झुरळांनी बेगॉनला हरवलं:धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडेंचा मोदींवर निशाणा




दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’ आणि विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनापुढे झुकत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. शनिवारी सोशल मीडियावर पत्र शेअर करत त्यांनी ही घोषणा केली. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून, भाजप नेते प्रल्हाद जोशी यांच्याकडे हंगामी शिक्षणमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधात मीम्सचा पाऊस पडत आहे. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. रविवारी त्यांनी सोशल मीडियावर झुरळ मारण्याच्या स्प्रेवर नरेंद्र मोदींचा फोटो असलेला एक फोटो शेअर केला. त्याला झुरळांनी बेगॉनला हरवलं, असे खोचक कॅप्शन देत त्यांनी थेट पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ठाकरे गट आणि मनसेने मुंबईत मोर्चा काढण्याची तयारी केली होती. मात्र, राजीनामा जाहीर झाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून विद्यार्थी आंदोलनाच्या या विजयाचा आनंद साजरा केला जाणार आहे. संदीप देशपांडे यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, पंतप्रधान महोदय, तुमची नाटके बस्स झाली. धर्म वाचवता वाचवता धर्मेंद्र वाचवायला कुठे निघालात? अशी टीका केली असून जनता पंतप्रधानांचा राजीनामा घेईल, असा इशाराही दिला आहे. पवारांचा श्रेयवाद आणि विलीनीकरणाची चर्चा पुण्यातील पत्रकार परिषदेत शरद पवारांनी प्रधान यांच्या राजीनाम्याचे श्रेय घेतले. दोन दिवसांपूर्वी मी मोदी-दिपकेंना भेटल्याचे परिणाम दिसत आहेत, असा दावा त्यांनी केला. दुसरीकडे फडणवीसांचा दौरा दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाविषयी होता, अशीही चर्चा आहे. पक्षश्रेष्ठींनी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याविषयी फडणवीसांचे मत जाणून घेतले, असे म्हटले जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *