![]()
वारकऱ्यांचे व्यासपीठ हे संत विचारांचे व्यासपीठ आहे. मला नेहमीच वेगळी ऊर्जा मिळते. या ठिकाणी राजकारण नको, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. श्रीक्षेत्र तरडे खुर्द (ता. धरणगाव) येथे वारकरी परंपरेच्या भक्तिमय वातावरणात वारकरी गुणीरत्न पुरस्कार व महंत पदवी दीक्षा प्रदान सोहळा उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महंत श्रीकांतदास महाराज होते. संत नामदेव खालसा आखाड्याचे प्रमुख महामंडलेश्वर अनंतदास महाराज यांच्या हस्ते बाबूलाल पाटील यांना महंत पदवी व वारकरी गुणीरत्न पुरस्कार देण्यात आला. गुलाबराव पाटील म्हणाले, संतांचे विचार केवळ ऐकण्यासाठी नाही तर आचरणात आणण्यासाठी आहेत. याच विचारांतून माणूस आणि समाज घडतो. वारकरी संप्रदाय ही आपली संस्कृती आणि ओळख असून, तिचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. तरडे सारख्या पवित्र भूमीत परमार्थाचे जे कार्य सुरू आहे, ते समाजासाठी प्रेरणादायी आहे. संतांच्या मार्गावर चालणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करतो. कार्यक्रमानंतर आमरस-पुरणपोळीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला आणि पसायदानाने सांगता झाली. यशस्वितेसाठी तरडे येथील तरुण मित्रमंडळ, संत तानसेन भजनी मंडळ व महिला मंडळाने परिश्रम घेतले. वारकऱ्यांच्या व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील. कार्यक्रमास या संत-महंतांची होती उपस्थिती कार्यक्रमास महंत प्रणवगिरी बाबाजी, महंत नागेशानंद, महंत योगी ऋषिनाथ, सौरभ महाराज, नवनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, गजानन वरसाडेकर, गोविंद महाराज पाचोरा, रूपचंद बाबा, कौतिक महाराज लोणीकर, स्वयंभू त्रिवेणेश्वर महादेव संस्थानाधिपती निमगाव,कृष्णा महाराज, प्रा. सी. एस. पाटील, रमेश महाराज, नाशिक येथील विविध संत-महंत मोठ्या संख्येने आले होते. सुमारे दीड तास श्रोत्यांमध्ये रंगले पालकमंत्री संत नामदेव खालसा आखाड्याच्या वतीने गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सुमारे दीड तास चाललेल्या या कार्यक्रमात गुलाबराव पाटील हे पूर्ण वेळ श्रोत्यांमध्ये बसून सहभागी झाले होते. व्यासपीठावर केवळ वारकरी, साधूसंत व कीर्तनकार मंडळी विराजमान होती.
Source link
वारकऱ्यांचे व्यासपीठ हे एक संत विचारांचे व्यासपीठ- पालकमंत्री:तरडेला वारकरी गुणीरत्न पुरस्कार व महंत पदवी दीक्षा प्रदान सोहळा