![]()
भारतीय जनता पक्षाला महायुतीमध्ये प्रथमच छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ सुटला. मात्र, शिवसेनेचे माजी मंत्री, आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुत्राने केलेल्या बंडखोरीमुळे भाजपच्या तोंडचे पाणी पळाले होते. भाजपने फुलंब्रीचे माजी नग
.
जिल्ह्यात ८०० कोटींची उलाढाल असलेल्या बँकेचा संचालक होणे आमदारापेक्षा कमी नाही. जिल्ह्याच्या राजकारणात स्थान पक्के करण्यासाठी जिल्हा बँक, दूध संघ ही सत्तास्थाने महत्त्वाची असल्याने सत्तार यांनी भविष्यातील राजकारणाचा विचार करून जिल्हा बँकेसाठी प्रयत्न सुरू केल्याचे मानले जाते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राज्याचे माजी मंत्री, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शड्डू ठोकले होते. भाजपवर आरोप करीत आपले पुत्र समीर सत्तार यांचा अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्ज दाखल करायला सत्तार पुत्र समीर हजर नव्हते, त्यामुळे निवडणुकीतून माघार निश्चित असल्याचे मानले जात होते.
जिल्ह्याच्या राजकारणात सहकारी बँक महत्त्वाची
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जिल्हाभरात जाळे आहे. पीक कर्ज व शेती अवजारांच्या कर्जासाठी जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा या बँकेशी संबंध येतो. बँकेच्या शाखा, ग्रामीण भागापर्यंत बँकेच्या माध्यमातून पतपुरवठा करणाऱ्या सोसायट्यांच्या माध्यमातून निर्माण होणारा संपर्क लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उपयुक्त ठरतो. त्यामुळे जिल्हा बँकेची सत्ता हाती ठेवण्यासाठी राजकीय नेत्यांचे प्रयत्न सुरू असतात. छत्रपती संभाजीनगर शहराच्या राजकारणात सत्तार यांना महत्त्वाचे स्थान मिळू शकणार नाही. मात्र जिल्ह्याच्या राजकारणात आपली स्थिती मजबूत करण्यासाठी जिल्हा बँक ताब्यात मिळावी, असे सत्तार यांचे प्रयत्न असल्याचे मानले जाते.
जिल्हा परिषदेत अपेक्षित यश नाही
जिल्हा परिषद निवडणुकीत जिल्ह्यात भाजपसोबत युती केली. नंतर मित्रपक्षाला सोडलेल्या जागांवरही ‘बी फॉर्म’ देण्यात आले. निवडणुकीनंतर शिवसेनेने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. परंतु अध्यक्ष, उपाध्यक्ष व एकही सभापतिपद मिळाले नाही. सत्तार यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघात जि. प.च्या सर्व जागा लढवल्या. त्यातही त्यांना एकहाती यश मिळाले नाही. दरम्यान, जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सत्तार यांनी आपला एकखांबी अंमल राहावा यासाठी प्रयत्न सुरू केले. वैयक्तिक मतदारसंघात सत्तार यांच्या २२ समर्थकांची नावे समाविष्ट केली. परंतु, यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले असताना सर्व नावे रद्द करण्यात आली. यामुळे हक्काचा मतदारसंघ हातून गेला.
दबावतंत्राचा वापर
जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आमदार सत्तार यांनी भाजपला अडचणीत आणण्याची संधी दवडली नाही. त्यांनी स्वतंत्र लढण्याची घोषणा केली. या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी शब्द द्यावा हे यामागील राजकारण असल्याचे मानले जाते. मुंबईत वरिष्ठांसोबत भेट घेतल्यानंतर आमदार सत्तार यांनी माघारीबाबत सूतोवाच केले. आता स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल, असे सांगण्यात आले.
सत्तार यांच्या माघारीची कारणे
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक महायुतीत लढायचे निश्चित झालेले आहे. राज्यात भाजप , शिवसेना (शिंदेसेना) व राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघात भाजपला सर्वाधिक जागा आहेत. यात भाजप २७०, शिवसेना १२५, राष्ट्रवादी ४५ असे संख्याबळ आहे. यामुळे महायुती सहजपणे या मतदारसंघातून विजयी होईल. शिवसेना भाजपच्या विरोधात गेली तरी राष्ट्रवादी आणि अपक्षांच्या मदतीने भाजप सहज विजयाचा जादुई आकडा गाठू शकते. विजयाचे गणित बसत नसेल तर राज्यात सत्तेत असताना रोष ओढवून घेणे सोयीस्कर होणार नाही, याची जाणीव सत्तार यांना आहे. त्यामुळे त्यांचे पुत्र निवडणूक रिंगणातून माघार घेणार असल्याचे मानले जाते.