Headlines

शरद पवारांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर:म्हणाले- पंतप्रधान मोदींची नेहरूंशी तुलना होऊच शकत नाही; ते खूप पुढे गेलेत




देशाच्या राजकारणात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळाची आणि विक्रमांची जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, जवाहरलाल नेहरू आणि मोदींची तुलनाच होऊ शकत नाही, या शरद पवार यांच्या विधानाचा समाचार चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवाहरलाल नेहरूंच्या खूपच पुढे आहेत, त्यांची तुलना होऊच शकत नाही, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांच्या विधानावर जोरदार पलटवार केला आहे. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शरद पवारांनी पुन्हा ‘गुगली’ टाकली
शरद पवारांच्या टीकेवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, शरद पवार हे नेहमीच ‘गुगली’ टाकत असतात. पवारांना प्रत्यक्षात हेच म्हणायचं होतं की मोदी हे मोदी आहेत, त्यांची नेहरूंशी काय तुलना होणार? ती होऊच शकत नाही. पुढे बोलताना पाटील म्हणाले, नेहरू स्वातंत्र्याच्या आधी जन्माला आले आणि मोदी स्वातंत्र्यानंतर जन्माला आले, त्याला आपण काय करू शकतो? पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीच्या काळात प्रचंड संघर्ष केला आहे. तेव्हा देशासाठी मरणं महत्त्वाचं होतं, आता देशासाठी जगणं
बदलत्या काळाचा संदर्भ देत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले. स्वातंत्र्यापूर्वी ‘देशासाठी मेले पाहिजे’ हा नारा होता, पण आता ‘देशासाठी चांगलं जगलं पाहिजे’ आणि देशाचा विकास केला पाहिजे हा नारा आहे. पंतप्रधान मोदींनी संपूर्ण जगामध्ये भारताचं नाव अत्यंत अभिमानाने आणि चांगल्या पद्धतीने कमावले आहे. त्यामुळे मोदी हे नेहरूंच्या खूप पुढे आहेत, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. …म्हणून सुरू आहे ‘नेहरू विरुद्ध मोदी’ वाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा देशाची सत्ता हाती घेत एक नवा ऐतिहासिक विक्रम नोंदवला आहे. या नवीन कार्यकाळात पंतप्रधान मोदी हे जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदावरील ४ हजार ३९८ दिवसांच्या सलग कार्यकाळाचा विक्रम मागे टाकणार आहेत. याच ऐतिहासिक विक्रमावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगले आहे. विलीनीकरणाच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचा खुलासा:’आमच्याशी कुणी संपर्कच केला नाही’, भाजपवरही जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी या सर्व चर्चांना स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, “विलीनीकरणाबाबत आमच्याशी कुणीही संपर्क केलेला नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही.” सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *