Headlines

शासकीय रुग्णालयाच्या छतावर बिअरच्या बाटल्यांचा खच:3 पोत्यांसह काही बादल्यां रिकाम्या बाटल्यांनी भरलेल्या, प्रशासनाचं दुर्लक्ष




हिंगोली येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालय अन रुग्णालयाच्या छतावर बिअरच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसून आला असून याठिकाणी तीन पोते भरून तसेच काही बादल्यांमध्ये रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. यामुळे रुग्णालय प्रशासनातच काही तळीराम असल्याचे स्पष्ट होत आहे. ज्या ठिकाणी सलाईनच्या रिकाम्या बाटल्या असणे अपेक्षित आहेत्या ठिकाणी चक्क बिअरच्या बाटल्या आढळून आल्याने रुग्ण अन नातेवाईकांमधून तिव्र संताप व्यक्त होत आहे. हिंगोली येथील शासकीय रुग्णालयाचे शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाकडे हस्तांतर झाल्यानंतर या ठिकाणी आरोग्य सुविधा चांगल्या प्रकारे मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असतांना रुग्णांची गैरसोय कायम आहे. एमआरआय मशीनच्या उदघाटन करण्यासाठी तब्बल 1 वर्षाचा कालावधी लागला होता. या शिवाय रुग्णालयात पिण्याच्या पाण्याच्या टंचाई जाणवत आहे. उन्हाळ्यामध्ये रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे चांगलेच हाल झाले आहेत. रुग्णालय प्रशासनाला टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत होता. रुग्णालय परिसरातील स्वच्छतागृह सुरु नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचे मोठे हाल होत आहेत. दरम्यान, रुग्णालयाची सुरक्षा देखील वाऱ्यावर असून सुरक्षा रक्षकांनाच मारहाण झाल्याचे प्रकार नुकतेच घडले आहेत. मात्र रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दरम्यान, शनिवारी ता. 3 काही सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या छतावर जाऊन पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी पोत्यांमधून चक्क बिअरच्या बाटल्या भरलेल्या दिसून आल्या. एवढेच नव्हे तर काही रिकाम्या बदल्यांमधूनही बाटल्या भरलेल्या दिसून आल्या आहेत. या प्रकारामुळे रुग्णालयातच काही तळीराम लपलेले असल्याचा आरोप केला जात आहे. प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. खोडसाळपणाचा प्रकार- अधिष्ठाता शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल म्हणाले की, छतावरील साहित्याचे निर्लेखन करण्यासाठी समितीने शुक्रवारीच ता. 3 तपासणी केली. त्यावेळी कोणालाही या पोत्यातील बाटल्या दिसल्या नाहीत.त्यामुळे आजचा प्रकार खोडसाळपणाचा आहे. अधिवेशन काळात प्रशासनाला अडचणीत आणण्यासाठी हा प्रकार केल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतरही सीसीटीव्ही फुटेज तपासून चौकशी केली जाणार आहे. सीसीटीव्ही पाहून दोषींवर कारवाई करा- कांडेलकर सामाजिक कार्यकर्ते निनाजी कांडेलकर म्हणाले की, रुग्णालय प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करावी. रुग्णालयाच्या छतावर नेहमी कोण जात आहे, कशासाठी जात आहे याचा शोध लाऊन त्यांची चौकशी करावी. त्यानंतरच खरा प्रकार उघडकीस येणार आहे. रुग्णालयात येऊन मद्य रिचविणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *