Headlines

संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम, त्यांना गांभीर्याने घेऊ नये:त्यांचीच डीएनए चाचणी करावी लागेल; संजय शिरसाटांची जीभ घसरली




भविष्यात कोण पंतप्रधान होईल कोणत्या निवडणुकीत काय होईल. यावर राज ठाकरेंनी भाष्य करणे योग्य आहे, आमच्या सारख्यांनी त्यामध्ये भाष्य करणे योग्य नाही. भविष्यात कोण पंतप्रधान होईल याची आता चिंता करण्याचे काही काम नाही. अमित शहा यांचे वक्तव्य अगदी योग्य आहे. आमच्या आमदार आणि खासदारांची संख्या जास्त आहे, जनतेने कोणती शिवसेना खरी हे मतदानातून सिद्ध केले आहे,असे शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. संजय शिरसाट म्हणाले की, विरोधी पक्षनेते पद देण्यासाठी त्यांच्याकडे संख्याबळच नाही. आम्ही कायद्याला कायद्याच्या भाषेत उत्तर देऊ. कायदा सांगतो संख्याबळ लागते ते असल्याशिवाय विरोधी पक्षनेतेपद देता येत नाही. अमित शहा हे पंतप्रधानपदाची तयारी करत आहेत की नाही हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. ते मोदींच्या पाठिशी आज खंबीरपणे उभे आहेत. यावर संजय राऊत यांनी भाष्य करू नये त्यांना कोणी गांभीर्याने घेऊ नये. राऊतांची डीएनए चाचणी करण्याची गरज संजय शिरसाट म्हणाले की, संजय राऊत काय बोलतील हे सांगता येत नाही. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. महाराष्ट्राची संस्कृती त्यांना माहिती नाही. ही ..ची अवलाद कायम असेच बोलणार आहे. टेस्ट ट्युब बेबी चालेल पण हे कोणाचे अवलाद आहे, यासाठी डीएनए चाचणी करावी लागेल. त्यांना ना आईचा धाक ना बापाचा धाक नाही. एकनाथ शिंदे यांनी त्यांचा बरोबर गेम केला आहे. ठाकरे कोणाशी संवाद साधत नाहीत संजय शिरसाट म्हणाले की, आमदार-खासदार उद्धव ठाकरेंकडे जातात तेव्हा त्यांच्याशी ते संवाद साधत नाहीत. आणि त्यांनी साथ सोडली की त्यांच्या मतदारसंघात जाण्याची घोषणा करतात. पण उद्धव ठाकरे हे त्या खासदारांच्या मतदारसंघात गेल्याने काहीही होत नाही. त्यांची अवस्था काय झाली आहे, त्यांची कारणे काय याचा विचार उद्धव ठाकरेंनी केला पाहिजे. ओमराजेंनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न संजय शिरसाट म्हणाले की, पवनराजे हत्याकांड प्रकरणी काल निकाल लागला या निकालामुळे ओमराजे यांना धक्का बसला आहे त्यामुळे पक्षप्रवेशासंदर्भात निर्णय घेण्यास त्यांना वेळ लागेल. परंतू तुम्ही निकालाच्या आधी काय बोलला होतात हे आठवा. तुम्ही दिलेल्या शिव्या कोर्टाची केस मॅनेज केली म्हणत होते. ओमराजेंवर आरोपांचा भडिमार करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून करण्यात आला. आता निकाल विरोधात गेल्यानंतर त्यांना साद घालण्याचा प्रयत्न करत आहेत. ओमराजेंनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. ओमराजे काय निर्णय घ्यायचा तो घेतील. आदित्य ठाकरे कसे वागता सर्वांना माहिती संजय शिरसाट म्हणाले की, आदित्य ठाकरे कसे वागतात सर्वांना माहिती आहेत. त्यांनी दिलेल्या आवाहनाला कोणी प्रतिसाद देणार नाही. महाराष्ट्रात ज्या राजकीय घटना घडत आहेत त्यासाठी उबाठाचे नेतेच कारणीभूत आहेत. सुषमा अंधारे यांना जर धमक्या आल्या असतील तर त्यांनी तक्रार दाखल केली पाहिजे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *