![]()
“विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि सामाजिक मूल्ये रुजविणारे दिंडीसारखे उपक्रम काळाची गरज आहेत. संत परंपरेने समाजाला समता, बंधुता आणि सेवाभावाची शिकवण दिली आहे. ही परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी शाळा आणि पालकांनी संयुक्तपणे पार पाड
.
ते म्हणाले, आजच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानप्रधान युगात मुलांना केवळ शैक्षणिक ज्ञान देणे पुरेसे नाही, तर त्यांच्यामध्ये चांगले संस्कार, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रप्रेमाची भावना विकसित होणे आवश्यक आहे. अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो आणि समाजात सकारात्मक विचारांची पेरणी होते.” दिंडी पूजन समारंभाचे उद्घाटन कोतवाली पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल चिटणीस यांच्या हस्ते झाले. यावेळी शिशु संगोपन संस्थेचे चेअरमन दिलीप गुंदेचा, व्हा. चेअरमन दशरथ खोसे, राजेश झालानी, ॲड. विजय मुनोत, संजय डागा उपस्थित होते.
दिंडी शहरातील विविध मार्गांवरून मार्गक्रमण करत असताना नागरिकांनी ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करून आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. कोतवाली पोलीस स्टेशनच्यावतीने पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिंडीचे विशेष स्वागत केले. तसेच त्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच ॲड. विजय मुनोत यांनी बारातोटी कारंजा परिसरात विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून दिंडीतील विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला. दरम्यान, दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह वारकरी परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या विविध वेशभूषा साकारल्या. विठ्ठलनामाच्या अखंड गजराने आणि भक्तिमय वातावरणाने परिसर दुमदुमून गेला. संस्कार, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा दिंडी सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. चेअरमन दिलीप गुंदेचा म्हणाले, “शिशु संगोपन संस्था विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच संस्कार, संस्कृती आणि सामाजिक मूल्यांची शिकवण देण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली ही दिंडी विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, शिस्त, एकात्मता आणि भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण करणारी ठरत आहे. बालदिंडीने जिंकली नगरकरांची मने दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह वारकरी परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या विविध वेशभूषा साकारल्या. विठ्ठलनामाच्या अखंड गजराने आणि भक्तिमय वातावरणाने परिसर दुमदुमून गेला. संस्कार, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा दिंडी सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.