![]()
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. खासदार कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी संभाजीनगर-जालना महामार्गावरील केंब्रिज चौकात जोरदार ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. काँग्रेसच्या या अचानक झालेल्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून तब्बल ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर पोलिसांनी आंदोलक खासदार कल्याण काळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. केंब्रिज चौकात अर्धा तास चक्काजाम! शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने ऐन गर्दीच्या वेळी केंब्रिज चौकात ठिय्या मांडला. जवळपास अर्ध्या तासाहून अधिक काळ हा मुख्य महामार्ग आंदोलकांनी रोखून धरला होता. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले आणि जालना रोडवर वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला. आंदोलनाची तीव्रता पाहता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत खासदार कल्याण काळे यांना ताब्यात घेतले, ज्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू झाले. शेतकऱ्यांच्या ‘या’ २ प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन खासदार कल्याण काळे यांनी यावेळी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर जोरदार टीका केली. आंदोलनामागे प्रामुख्याने दोन मोठ्या मागण्या होत्या: 1. कर्जमाफीच्या जाचक अटी रद्द करा: सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील जाचक अटी त्वरित रद्द करून सरसकट शेतकऱ्यांना लाभ द्यावा. 2. ऑनलाईन खतविक्रीचे ‘अॅप’ बंद करा: सरकारच्या ऑनलाईन खतविक्रीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. खतविक्रीसाठी सरकारने सुरू केलेले ऑनलाईन अॅप तात्काळ बंद करावे, अशी मागणी काळे यांनी लावून धरली. …तर पुन्हा दुसरे आंदोलन करू- कल्याण काळेंचा इशारा पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार कल्याण काळे यांनी सरकारला थेट इशारा दिला. ते म्हणाले, हे आंदोलन केवळ सुरुवात आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आणि ऑनलाईन खतविक्रीचे जाचक अॅप बंद केले नाही, तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे दुसरे मोठे आंदोलन छेडले जाईल.” मोदींना रोखण्यासाठी देशात आता काँग्रेस हाच एकमेव पर्याय: हर्षवर्धन सपकाळांचा दावा, निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशांचा अमाप वापर केल्याचा आरोप देशातील बदलत्या राजकीय समीकरणांवर भाष्य करताना काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी एक मोठे विधान केले आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी राहुल गांधी हाच एकमेव पर्याय आहे, असे सपकाळ यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सविस्तर वाचा
Source link
संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचा रास्तारोको:खासदार कल्याण काळे पोलिसांच्या ताब्यात, ‘पुन्हा आंदोलन करू’चा इशारा