Headlines

संभाजीनगरात 10 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न:रिक्षा नालीत अडकल्याने अनर्थ टळला, नागरिकांनी पाठलाग केल्याने अपहरणकर्ता पसार




शहरातील शहागंज बाजारात बुधवारी (22 जुलै) रात्री दहा वाजेच्या सुमारास एका 10 वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाचा प्रकार समोर आला आहे. एका मुलीचे तोंड दाबून तिला रिक्षात बसवल्याचे लक्षात आल्याने तिघांनी त्याचा पाठलाग केला. अपहरणकर्त्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कोषागार कार्यालयाकडे ऑटोरिक्षा वळवली. मात्र, तेथे नालीत रिक्षा रुतल्याने तो रिक्षा व मुलीला सोडून पसार झाला. पोलिसांत दाखल तक्रारीनुसार फिर्यादी सरकारी कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत आहे. त्यांची बहीण शाहगंजमध्ये भाजीपाला विक्री करते. फिर्यादी आपल्या वर्षांच्या मुलीसह बहिणीकडे गेले होते. त्यांच्या बहिणीने मुलीला खाऊसाठी पैसे देऊन दुकानात पाठवले. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या रिक्षाचालकाने (रिक्षा क्र. एमएच 20 इएफ 4428) “मी तुझ्या आंटीला ओळखतो. आपण कुरकुरे घेऊन येऊ’ असे म्हणत तिला 100 रुपये दिले. पण मुलगी रिक्षात बसत नसल्याने त्याने तिचे तोंड दाबून रिक्षात बसवत रिक्षा दामटला. हा प्रकार बघून आरेफ सईद खान, शेख युसूफ शेख यासीन, मोसिन खान मोईन खान यांना संशय आल्याने त्यांनी रिक्षाचा पाठलाग सुरू केला. रिक्षा रजिस्ट्री ऑफिसकडे जाताना नालीत अडकली. त्याचवेळी लोकांना बघून त्याने रिक्षा व मुलीला तेथेच सोडून पळ काढला. घटनेनंतर सिटी चौक ठाण्याचे एपीआय मनोज शिंदे पथकास घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रिक्षा ताब्यात घेऊन मुलीला पालकांच्या स्वाधीन केले. रिक्षा नालीत अडकल्याने अपहरणकर्ता पळून गेला रिक्षात एकटाच माणूस होता. त्याने तिचे तोंड दाबून रिक्षात बसवले. रिक्षा रजिस्ट्री ऑफिसकडील नालीत अडकला. अनेक जण अपघात झाल्याचे समजून तिकडे गेले. लोकांना बघून अपहरणकर्त्याने पळ काढला. रिक्षा-मुलगी तिथेच होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *