![]()
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दिलेला अंत्योदयाचा मंत्र हा प्रत्येक भाजप कार्यकर्त्यासाठी आत्मा आहे. पक्षाचा विचार घेऊनच समाजातील सर्व क्षेत्रांत काम करताना पक्ष संघटना हेच आपल्या सर्वांसाठी खरे बळ आहे. देशाच्या विकास प्रक्रियेलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच अंत्योदयाच्या विचारांची जोड दिली आहे,” असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. भाजपच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी शिर्डी येथे आयोजित दोन दिवसांच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण शिबिराचा समारोप मंत्री विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. याप्रसंगी आमदार मोनिका राजळे, आमदार अक्षय कर्डिले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, प्रदेश पदाधिकारी रवीजी अनासपुरे, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दिलीप भालसिंग, अनिल मोहिते आदी उपस्थित होते. या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात एकूण ११ अभ्यासपूर्ण सत्रांचे आयोजन केले होते. यात भाजप महिला प्रदेशाध्यक्षा आ. चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, माजी आमदार राम सातपुते, प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये, लक्ष्मण सावजी, सचिव भैरवी वाघ, अजित चव्हाण तसेच लातूर मनपाच्या नगरसेविका प्रेरणा होनराव यांनी वेगवेगळ्या विषयांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. समारोप सत्रात बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, या शिबिराला मोठे वैचारिक अधिष्ठान होते. प्रशिक्षणानिमित्त सर्व कार्यकर्त्यांना दिलेले पुस्तक हे आपल्या सर्वांसाठी ‘गीतेसमान’ असून, त्यातील विचारांनुसार आता बूथ स्तरापर्यंत आपल्याला पक्षकार्य अधिक मजबूत करायचे आहे. राष्ट्र प्रथम’ हीच भावना कृतीत असावी “आपल्या राजकीय व सामाजिक कार्यात वैचारिक भूमिका नेहमी स्पष्ट असायला हवी. ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना आपल्या प्रत्येक कृतीत दिसली पाहिजे. समाजाच्या शेवटच्या घटकाचा विकास होईल तेव्हाच देशाचा खऱ्या अर्थाने विकास होईल. भाजप हा एक परिवार आहे ही भूमिका घेऊन कार्यकर्त्यांनी समाजात चांगला संवाद आणि चांगल्या वर्तनाच्या जोरावर लोकांना पक्षाशी जोडावे,” असे आवाहनही मंत्री विखे पाटील यांनी केले.
Source link
सर्व क्षेत्रांत काम करताना पक्ष संघटना हेच खरे बळ:मंत्री विखे पाटील यांचे प्रतिपादन; बूथ स्तरापर्यंत कामाला गती देण्याचे आवाहन