Headlines

साताऱ्यात विद्रोही साहित्य संमेलनाची सांगता:अनेक ठराव मंजूर, पर्यायी सांस्कृतिक राजकारण स्त्रियांच्या खांद्यावरुन येणार – संभाजी भगत




ऐतिहासिक सातारा शहरात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या १२५ व्या जंयती वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेलं १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन यशस्वीपणे पार पडलं. या संमेलनाच्या समरोप सत्रात संमेलनाचे अध्यक्ष लोकशाहीर संभाजी भगत, कॉ. सुबोध मोरे, ॲड. वर्षा देशपांडे, वाहरु सोनवणे, अविनाश कदम आणि कॉ. धनाजी गुरव यांची भाषणे झाली. आपल्याला या संमेलनानंतर काय करायचं आहे हे ठरवावं लागेल. देशातील नवं आणि पर्यायी सांस्कृतिक राजकारण स्त्रियांच्या खांद्यावरुन येणार आहे. नव्या युगाचं नवं सांस्कृतिक राजकारण सर्व समाजवादी, आंबेडकरवादी इत्यादींना सोबत घेण्यासाठी समिती करुन नेत्यांना भेटणार आहे. नवं सांस्कृतिक राजकारण आपल्या सर्वांना मिळूनच आणावं लागेल,असं संभाजी भगत यांनी म्हटलं. यावेळी लोकशाहीर संभाजी भगत यांनी ये हिटलर के साथी हे गीत सादर केलं. विचारधारा संपलेल्या पक्षांना विचार दिला पाहिजे – वर्षा देशपांडे एकमेकांसोबत असणारी मंडळी आपण सोबत आलोत ही चांगली गोष्ट आहे. आपल्याच मुलांचा आज बुद्धीभेद केला जातोय, त्यांना आमच्यात समोर उभं केलं जात आहे. या मुलांना परत आणण्यासाठी त्यांच्या पालकांकडे जावं लागेल. पालकांशी बोलून त्यांना आपल्या वारशाची जाणीव करुन देऊन मुलांना परत आणलं पाहिजे, असं वर्षा देशपांडे यांनी म्हटलं. आपल्या प्रतिकांना जाणीवपूर्वक पळवून नेण्याचं काम सुरु आहे. लोकशाही वाचवण्यासाठी संसद, विधानसभेसमोर जाण्यापूर्वी आपण गावात गेलं पाहिजे आणि गावांची ताकद उभी केली पाहिजे. सांस्कृतिक विचारधारा देणाऱ्या मंचावर भविष्यकाळात विचारधारा संपलेल्या पक्षांना विचार देण्याचं काम व्हायला पाहिजे, असं वर्षाताई देशपांडे यांनी म्हटलं. चळवळ कृतीशील करुया – अविनाश कदम पहिलं विद्रोही साहित्य संमेलन धारावीत झालेलं होतं. देशातील निर्माण झालेली गंभीर स्थिती पाहता आपण केलेलं काम वाया गेलं का याचा विचार केला पाहिजे. २७ वर्ष झाल्यानंतर विद्रोहीची चळवळीची पद्धत बदलायला पाहिजे का याचा विचार केला पाहिजे. सांस्कृतिक राजकारण कसं केलं पाहिजे, चळवळ तळागळात कशी पोहोचेल, रस्त्यावरचा, वस्त्यांवरचा माणूस चळवळीत कसा येईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.लोकं स्वत:हून चळवळीत कृतीशील सहभागी होतील यासाठी संकल्प करुया, असं विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे प्रवक्ते अविनाश कदम यांनी म्हटलं. आदिवासी हे वनवासी नसून मूलनिवासी – वाहरुभाऊ सोनवणे विद्रोह कशाच्या विरोधात आहे? विद्रोही साहित्य संमेलनात जमलेला समुह मानव आहे, मानवजातीच्या समुहाला येणाऱ्या अडचणींना ठोकर मारत जाण्याचा मार्ग म्हणजे विद्रोह आहे.मानवमुक्तीच्या विचारानं घर विद्रोही झालं पाहिजे, गाव विद्रोही झालं पाहिजे, महाराष्ट्र विद्रोही झाला पाहिजे. इथला आदिवासी समुह हा वनवासी नसून इथला मूलनिवासी आहे. अन्याय अत्याचार, दमनाला विरोध करणारा विद्रोही आहे. साहित्य संस्कृती संमेलनात मंजूर केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करण्यासाठी संघर्ष केला पाहिजे, असं वाहरुभाऊ सोनवणे यांनी सांगितलं कॉ. सुबोध मोरे यांनी विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं इतर पुरोगामी पक्ष संघटनांच्या वतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाडच्या चवदार तळ्याच्या १२५ व्या वर्षानिमित्त आणि महात्मा फुले यांच्या जयंतीच्या २०० व्या वर्षानिमित्त अधिकाधिक कार्यक्रम आयोजित करावेत असं त्यांनी म्हटलं. प्रशांत अंबी यांचा सत्कार कॉ. गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत अंबी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. नुकत्याच झालेल्या पुस्तकावरुन झालेल्या वादानंतर त्यांनी शिवाजी कोण होता? हे पुस्तक लाखो वाचकांपर्यंत आणि शिवप्रेंमीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. यानिमित्तानं प्रशांत अंबी यांचा सत्कार करण्यात आला. विकास लवांडे यांच्यावरील शाईफेकीचा निषेध भागवत वारकरी संप्रदायात संघर्ष सुरु आहे. संतांचा विचार आणि मनुवादी विचार असा तो संघर्ष आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून खरे विचार मांडण्याचं काम विकास लवांडे यांनी केलं. जातीयवादी वक्त्यानं त्यांच्यावर शाईफेक केली आहे त्या भ्याड कृतीच्या निषेधाचा ठराव १५ वे विद्रोही साहित्य संमेलनाच्यावतीनं करण्यात आला. देशातील लोकशाही वाचवायची असेल तर निवडणुकीच्या राजकारणात आपल्याला लक्ष घालावं लागेल. चळवळीत युवकांनी नेतृत्त्व हाती घ्यावं असं कॉ. धनाजी गुरवा यांनी म्हटलं. समारोप सत्रात संमेलन संयोजन समितीचे डॉ. प्रशांत पन्हाळकर,अॅड. राजेंद्र गलांडे, दिनकर दळवी, अॅड. सत्यवान कमाने, प्रा. डॉ. आर. के. चव्हाण, आयु. हणमंत सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. संमेलनातील विविध ठराव कॉ. धनाजी गुरव यांनी मांडले, ते ठराव समारोप सत्रात उपस्थित असणाऱ्या सर्वांनी टाळ्या वाजवून मंजूर केले. समारोप सत्रात विविध ठराव मंजूर करण्यात आले. या ठरावांची अंमलबजावणी व्हावी यासाठी कालमर्यादा घालून त्यासाठी प्रयत्न करावेत, त्याची अंमलबजावणी न झाल्यास आंदोलनाचा मार्ग निवडला पाहिजे, असा ठराव यावेळी करण्यात आला.
१५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनातील ठराव



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *