Headlines

सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांना डावलले!:दोघांच्याही पदांचा उल्लेख नाही; निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रातून नवी माहिती समोर




राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात खासदार सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर कार्याध्यक्ष हे पद नमूद केलेले नाही. त्यामुळे ही दोन्ही नेते त्या पदांवर आहेत की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाला 29 एप्रिल रोजी एक पत्र दिले आहे. या पत्रात अरुणाचल प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष टोको तातूंग यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष म्हणून उल्लेख केला आहे. पण त्याच यादीत सुनील तटकरे यांच्या नावासमोर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असे नमूद केलेले नाही. सुनील तटकरे यांच्या नावासमोर केवळ लोकसभेचे गटनेते म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. तर दुसरीकडे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर देखील राष्ट्रीय कार्याध्यक्ष नमूद करण्यात आलेले नाही. त्यांच्या नावासमोर केवळ राज्यसभेचे गटनेते असा उल्लेख आहे. पत्रात बदल केला जाईल – सुनेत्रा पवार दरम्यान, काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ट्विट करत सांगितले होते की या पत्रात बदल केला जाईल. मात्र अद्याप यात कोणताहीह बदल करण्यात आला नसल्याची माहिती समोर आली आहे. पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांकडूनही त्या पत्रात बदल केल्याची किंवा चूक सुधारल्याची अद्याप तरी माहिती दिलेली नाही. त्यामुळे 29 एप्रिलच्या पत्रानुसार सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष नाहीत आणि प्रफुल्ल पटेल हे पक्षाचे कार्याध्यक्ष नसल्याची सुत्रांची माहिती आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे नाव दुसऱ्यांदा वगळण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. तसेच हे पत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर देखील आले होते. यावर सुनेत्रा पवारांनी स्पष्टीकरण दिले असून, त्या म्हणाल्या की, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत तांत्रिक आणि क्लेरीकल चूक असून ती लवकरच दुरुस्त केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. पार्थ पवार जनरल सेक्रेटरी या पत्रात जनरल सेक्रेटरी म्हणून पार्थ पवार आणि जय पवार यांच्या नावांचा उल्लेख आहे. मात्र तटकरे आणि पटेल यांना जाणीवपूर्वक डावलले जात आहे का? आणि यामागे पार्थ पवारांचे या दोन नेत्यांसोबत सुरू असलेले शीतयुद्ध आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच ही खरेच तांत्रिक चूक आहे की जाणीवपूर्वक केले जात आहे, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *