Headlines

स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या शौर्य, पराक्रम अन् बलिदानाचा जागर:छत्रपती संभाजी महाराज जयंती विविध उपक्रमांनी साजरी‎



स्थानिक छत्रपती संभाजी महाराज चौक येथे मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण क

.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने पूजन करत जिजाऊ वंदनेद्वारे छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केले. उपस्थितांनी संभाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि हिंदवी स्वराज्य रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाचा गौरव करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले.

यावेळी विजय गोंडचवर, रविंद्र मालठाणे, मुरलीधर ठाकरे, सुरेश चिखले, सुभाष अतकरे, श्रीकृष्ण कडू, गोविंदराव बुरघाटे, मंगेश मालठाणे, प्रविण गाडगे, राहूल कडू, निलेश वैद्य, दादाराव जायले, रूपेश लहाने, जितेंद्र रोडे, रसिक देशमुख, सुशिला कडू, किरण ठाकरे, प्रिती गाडगे, नगरसेविका अक्षरा लहाने, अपर्णा रोडे आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमादरम्यान छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला.त्यांच्या राष्ट्रनिष्ठा, धर्मरक्षण आणि स्वाभिमानी विचारांचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. संपूर्ण परिसर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *