![]()
हिंगोली जिल्ह्यात भूकंपाची मालिका सुरुच असून शनिवारी ता. २५ रात्री सहा वाजून ४९ मिनीटांनी जिल्हा भूकंपाने हादरला आहे. कळमनुरी तालुक्यातील म्हैसगव्हाण हे भूकंपाचे केंद्र बिंदू असून भूकंपाची ३.१ रिश्टर स्केल नोंद झाली आहे. वारंवार होणाऱ्या भूकंपाने जिल्ह्यातील नागरिक आता पुरते घाबरले आहेत. हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षापासून जमीनीतून आवाज येण्याची मालिका सुरु होती. अचानक जमीनीतून गडगडाट होऊन मोठा आवाज होत होता. त्यानंतर भूकंपाची मालिका सुरु झाली. मागील सहा वर्षात सुमारे ३६ वेळा भूकंपाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वात मोठा भूकंप ४.६ रिश्टर स्केल नोंदवला गेला आहे. दरम्यान शनिवारी ता. २५ रात्री सहा वाजून ४९ मिनीटांनी पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. कळमनुरी तालुक्यातील म्हैसगव्हाण हे भूकंपाचे केंद्रबिंदू आहे. या भागात चांगलेच हादरे बसले असून त्यासोबतच जिल्ह्यातील इतर ठिकाणीही भूकंपामुळे जमीनीला हादरा बसला आहे. भूकंपाचे केंद्रबिंदू आता वसमत, औंढा नागनाथ तालुक्यातून कळमनुरी तालुक्याकडे जात असल्याचे आजच्या भूकंपावरून दिसून येत आहे. भूकंपाची कारणे शोधण्यासाठी नांदेडच्या स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भूकंपशास्त्र विभागाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. मात्र दोन वेळा प्रस्ताव त्रुटी काढून परत पाठविण्यात आला आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनानेही सदर प्रस्ताव मंजूरीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु केला आहे. मात्र भूकंपाचा आवाज शासनापर्यंत पोहोचतच नसल्याने सदर प्रस्ताव शासनाकडे धुळखात पडला आहे. या प्रस्तावानुसार हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर भागात जमीनीची तपासणी करणे, भूगर्भातील खडकाची तपासणी करण्याचे काम केले जाणार असून इतर माहितीही गोळा केली जाणार आहे. त्यासाठी सुमारे ७.५० कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. मात्र शासनाकडून अद्यापही सदर निधीचा प्रस्ताव मंजूर केला नसल्याने जिल्ह्यातील नागरीकांतून तिव्र संताप व्यक्त केला जात आहे. हे ही वाचा… 22 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येबद्दल शब्द नाही:पोलिसांच्या अत्याचारावर मौन, नुकसानभरपाईचे काय? प्रधानांच्या राजीनाम्यावर आंबेडकरांची टीका ‘नीट’ परीक्षेतील गोंधळ, पेपरफुटी आणि दिल्लीतील जंतर-मंतरवर पेटलेल्या विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व आंदोलनाच्या तीव्र दबावापुढे अखेर केंद्र सरकारला झुकावे लागले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला असून, त्यांनी आपले राजीनामा पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवले आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांनी या निर्णयाची घोषणा करत राजीनाम्यामागील भूमिका मांडली. दरम्यान, या राजीनाम्यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत तीव्र शब्दांत टीका करत, “प्रधान यांनी राजीनामा देऊन आगीत तेल ओतण्याचे काम केले असून, कधीही न झुकणाऱ्यांना आता जनतेसमोर नाक रगडावे लागले आहे,” असा घणाघाती टोला लगावला आहे. सविस्तर वाचा… ‘जेनझी’ने सरकारच्या झिंज्या उपटल्या:उद्याचा तिरंगा मार्च होणारच, शिवाजी पार्कवर तरुणांचा विजयोत्सव साजरा करू – ठाकरे बंधू ‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर आणि गृहखात्यावर घणाघाती हल्ला चढवला. “हा देशभरातील तरुणाईचा आणि ‘जेनझी’चा ऐतिहासिक विजय असून, त्यांनी मस्तवाल सरकारच्या झिंज्या उपटून त्यांना जमिनीवर आणले आहे,” असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. तर, “पोलिसांच्या अत्याचारावर कारवाई झाली नाही, तर आता तरुणाईचा मोर्चा गृहमंत्री अमित शहांकडे वळल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. सविस्तर वाचा…
Source link
हिंगोली जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा धक्का:3.1 रिश्टर स्केलची नोंद, म्हैसगव्हाण केंद्र बिंदू; 6 वर्षात 36 वेळा भूकंपाची नोंद