Headlines

हिंजवडी आयटी पार्कमधील 15 लाख नोकऱ्या धोक्यात:आदित्य ठाकरेंचा धक्कादायक दावा, राज्य सरकारने तातडीने लक्ष देण्याची मागणी




राज्याच्या विविध शहरांच्या आणि जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांनी चाकणनंतर नुकतीच पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कची पाहणी केली. या पाहणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हिंजवडी आयटी पार्कमधील तब्बल 15 लाख लोकांच्या नोकऱ्या जाणार असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याने आणि मांडलेल्या आकडेवारीने मोठी खळबळ उडाली असून, राज्य सरकारने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन लोकांच्या नोकऱ्या वाचवल्या पाहिजेत, अशी आग्रही मागणी आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, अनेक कंपन्या महाराष्ट्र सोडण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात जाण्याच्या तयारीत आहे. या कंपन्यांना मूलभूत सुविधा मिळत नाही. रस्ते, पाण्याच्या समस्या आहेत. वीजेची समस्या आहे. हिंजवडीमधून अनेक मेसेज आले. हिंजवडीमध्ये मोठे आयटी पार्क आहे. या आयटी पार्कवर जवळपास साडेसहा लोक थेट अवलंबून आहेत. तसेच जवळपास 15 लाख लोकांना अप्रत्यक्षरित्या या भागातून रोजगार मिळतो. या भागात वाहतूक कोंडी वाढत आहे, असे मागील तीन वर्षांपासून ऐकत आहे. समस्या सोडवल्याने लोकांची जीवनशैली सुधारेल. पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, स्थानिक, ग्रामस्थ, नोकरदारांकडून समस्या समजून घेत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर फुटपाथ नाही. मेट्रो चालू नाही. दोन-तीन महिन्यांपासून मेट्रो सुरू नाही. त्याच्या उद्घाटनाची तारीख मिळेना झाली आहे. ही गोष्ट म्हणजे पाइपगॅस सर्वच इमारतीत नाही. कचऱ्याची समस्या आहे. इथे कोणी लक्ष देत नाही. काही चौकात PWD, PMRDA, PCM या तिन्ही संस्थेचे रस्ते आहेत. असा गोंधळ पाहायला मिळत आहे. मागील तीन चार वर्षांत नवीन कंपन्या आलेल्या नाहीत. आताच्या कंपन्या विचार करत आहे की, फेज तीनमधून फेज एक मध्ये जाण्यासाठी एक-दीड तास लागत आहे. हा प्रश्न त्यांच्यासमोर असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. तसेच काही संघटना मागच्या वर्षी मुख्यमंत्र्यांना भेटल्या. अनेक मदत मागत असतात. वाहतूक कोंडीची समस्या आहे. वाहतूक पोलिसांची संख्या वाढवण्याची गरज आहे. सिग्नल आहे. स्मार्ट सिग्नल हवेत. रस्ते व्यवस्थित नाही. तीन-चार गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले तर मोठा दिलासा मिळू शकतो. काही मुद्दांवार काम केल्यास राज्य सरकार नोकऱ्या वाचवू शकते, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *