'पोर्टर' ॲपद्वारे पुण्यात ड्रग्जची विक्री उघड:शिरूरमध्ये तिघांना अटक, 29 लाखांचा मुद्देमाल जप्त
पुण्यात ‘पोर्टर’ ॲपचा वापर करून ड्रग्जची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शिरूर परिसरात कारवाई करत तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 47.60 ग्रॅम ‘एमडी’ (मेफेड्रोन) आणि दोन चारचाकी वाहनांसह एकूण 29 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेला शिरूरमधील न्हावरा फाटा ते…