Headlines

लव्ह अफेअर, सुपारी अन् कारने चिरडले…:ठाण्यातील इंजिनिअरच्या मृत्यूचे गूढ उलगडले; नेमकं काय घडलं?

ठाणे येथील जलसंधारण विभागात अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या लक्ष्मण मंडले यांच्या खुनाचा कराड पोलिसांनी थरारक उलगडा केला आहे. पत्नीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याने पती अडथळा ठरत होता. त्यामुळे पत्नीनेच प्रियकर आणि त्याच्या साथीदाराच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पत्नी, तिचा भाऊ, प्रियकर आणि त्याचा साथीदार अशा चौघांना अटक करण्यात…

Read More

ममतांनी कल्याण बॅनर्जींना लोकसभेतील चिफ व्हीप बनवले:अध्यक्षांना पत्र लिहिले; 20 बंडखोर खासदारांनी काकोलींची केली व्हीपपदी नियुक्ती

तृणमूल काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी कल्याण बॅनर्जी यांची लोकसभेतील पक्षाचे मुख्य प्रतोद (चीफ व्हिप) म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने रेकॉर्डवर घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. एक दिवसापूर्वी, टीएमसीच्या लोकसभेतील २८ खासदारांपैकी २० जणांनी बंडखोरी करत ममतांची साथ सोडली…

Read More

Dharavi Redevelopment Plan: 10,000 Homes by 2028

आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असलेल्या धारावीचा चेहरामोहरा येत्या काही वर्षांत पूर्णपणे बदलणार आहे. सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्यात येणार असून, हा प्रकल्प केवळ इमारती उभारण्या . ‘धारावीकरच प्रकल्पाच्या केंद्रस्थानी असले पाहिजेत’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, धारावी पुनर्विकास प्रकल्प राबवताना तेथील नागरिकांचे हित, त्यांची उपजीविका आणि स्थानिक…

Read More

विधान परिषद निवडणूक:मतफुटी रोखण्यासाठी सर्व नगरसेवकांची गोवा वारी, संपूर्ण 'टूर प्लॅन' समोर; काँग्रेसच्या दाव्याने वाढली धाकधूक?

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीत भाजपची मते फुटू नयेत (क्रॉसव्होटिंग रोखण्यासाठी) आणि पक्षाचे सर्व नगरसेवक एकसंघ राहावेत, यासाठी भाजपने तगडी तटबंदी उभारली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भाजप नागपूर महानगरपालिकेतील आपल्या सर्व नगरसेवकांना तब्बल तीन दिवस गोव्याला नेणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. नागपूरच्या स्थानिक…

Read More

कळमनुरीत अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई:तीन ट्रकमधून 2.34 कोटींची 1265 पोती सुपारी जप्त; 8 जणांवर गुन्हे दाखल

कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे एका हॉटेल समोर उभ्या असलेल्या तीन ट्रकची अन्न व औषध प्रशासनाच्या तीन जिल्हयातील पथकाने छापा टाकून तपासणी केली. यामध्ये मानवी आरोग्यास अपायकारक असलेली २.३४ कोटी रुपये किंमतीची १२६५ पोते सुपारी पकडली आहे. या प्रकरणी आठ जणांविरुध्द मंगळवारी ता. ९ आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तिघांना चौकशीसाठी…

Read More

India Bloc & SP Advantage? Early Polls Likely

लखनऊ20 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ८ जून, नवी दिल्ली- इंडिया ब्लॉकची दिल्लीत बैठक झाली. २५ राजकीय पक्ष यात सहभागी झाले. यूपीमधून सपा प्रमुख अखिलेश यादव सहभागी झाले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले- SIR आणि निवडणुकीच्या निष्पक्षतेबाबत CJI यांना पत्र लिहू. ५ जून, नवी दिल्ली- राहुल गांधींसोबत यूपीमधील प्रमुख दलित आणि अति मागासवर्गीय नेत्यांची बैठक झाली. विधानसभा…

Read More

शक्तिपीठ महामार्गावरून कोल्हापुरात एल्गार!:सतेज पाटील-राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा; हजारो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधातील आंदोलन आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. कोल्हापुरात आज (९ जून) शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या वतीने विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी करणार आहेत. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा निघणार असून, हजारो…

Read More

90 वर्षांच्या आजीची मोठी कायदेशीर लढाई!:नातू-पणतूंना दिलेली जमीन परत मिळवली, बक्षीसपत्र अन् फेरफार रद्द; लातूरमधील प्रकरण

वृद्धत्वाकाळात मुलांकडून किंवा नातवंडांकडून संगोपन आणि देखभालीची अपेक्षा ठेवून हक्काची जमीन नावावर करणाऱ्या एका ९० वर्षीय आजीला प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. संपत्ती नावावर करून घेतल्यानंतर आजीकडे दुर्लक्ष करणाऱ्या नातू आणि पणतूला लातूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी जोरदार चपराक दिली आहे. लातूर तालुक्यातील कारसा येथील हौसाबाई लहाडे यांनी नातू आणि पणतूच्या नावावर केलेले आठ एकर जमिनीचे बक्षीसपत्र…

Read More

Uddhav Thackeray Demands PM Face for INDIA Alliance

आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागलेल्या INDIA आघाडीत नेतृत्वाच्या मुद्द्यावरून नवी चर्चा सुरू झाली आहे. विरोधी पक्षांच्या महत्त्वाच्या बैठकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आघाडीसमोर दोन महत्त्वाच्या मागण्या ठेव . आघाडी आहे, पण नेता कोण? 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी INDIA आघाडीची स्थापना करण्यात आली होती. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस,…

Read More

मुंबई HC च्या निवृत्त जजचा दावा – संपूर्ण कुटुंब संकटात:मुलीवर लंडनमध्ये हल्ला; दाऊदी बोहरा उत्तराधिकार प्रकरणात निकाल दिल्याने धमक्या

मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती गौतम पटेल यांचा दावा आहे की, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला गेल्या 10 महिन्यांपासून धमक्या मिळत आहेत. माजी न्यायमूर्तींचा दावा आहे की या घटना 2024 मध्ये दाऊदी बोहरा समुदायाच्या उत्तराधिकार विवादावर त्यांनी दिलेल्या निर्णयाशी संबंधित आहेत. न्यायमूर्तींकडे मागणी केली जात आहे की, त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड करून आपला निर्णय मागे घ्यावा…

Read More