Headlines

ठाण्यात टायर गोदामाला भीषण आग:धुराचे लोट पाहून नागरिकांची धावपळ; आगीचे कारण अस्पष्ट, जीवितहानी नाही

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रालगतच्या शिलफाटा परिसरात आज एका टायर गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून दूरवरूनही धुराचे प्रचंड लोट दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिलफाटा परिसरातील टायर साठवणूक गोदामात अचानक आग लागली. टायर आणि ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने वेगाने संपूर्ण गोदामाला विळखा घातला. घटनेनंतर…

Read More

व्यापाऱ्याच्या खिशात बॉम्बसारखा फुटला चायनीज मोबाईल:पँटला आग लागली, पाय-बोटे गंभीररित्या भाजले, दुकानात धूर भरला

जोधपूरमध्ये एका किराणा व्यापाऱ्याच्या पॅन्टच्या खिशात ठेवलेला मोबाईल अचानक बॉम्बसारखा फुटला. त्यानंतर मोबाईलला आग लागली. त्यात व्यापाऱ्याच्या गुडघ्याच्या वरचा (मांडीचा) भाग आणि हाताची बोटे गंभीररित्या भाजली. त्वचाही सोलवटली गेली आहे. तडफडणाऱ्या व्यापाऱ्याने स्वतःला वाचवण्यासाठी खिशातून जळणारा फोन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या हाताची बोटे भाजली. ही घटना मंडोर कृषी मंडी परिसरात सोमवारी दुपारी घडली….

Read More

हिंगोलीत महागाईच्या विरोधात ठाकरे गटाचे आंदोलन:गॅस अन् जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करा, अन्यथा 'शिवसेना स्टाईल'ने आंदोलनाचा इशारा

केंद्र आणि राज्य सरकारने जनतेला ‘अच्छे दिन’चे खोटे स्वप्न दाखवून महागाईच्या खाईत लोटले आहे, असा घणाघात करत हिंगोलीतील महात्मा गांधी चौकात उबाठाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. वाढती महागाई, शेतकरी-युवकांचे प्रलंबित प्रश्न, आणि प्रशासकीय भ्रष्टाचाराविरोधात चक्क रस्त्यावर स्वयंपाक करत ‘उबाठा’ च्या पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी केली. तर मागण्या पूर्ण न झाल्यास आगामी काळात ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलन…

Read More

छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेत 43 अर्ज अवैध:संजना जाधव, समीर सत्तार, अण्णासाहेब माने यांचे अर्ज बाद, अब्दुल सत्तारांना मोठा झटका

700 कोटींची उलाढाल असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकमेकांसमोर आले आहेत. मनपा, जिल्हा परिषद गमावल्यानंतर शिवसेनेने निवडणूक जिंकण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. याच कारणामुळे पालकमंत्री शिरसाट रिंगणात उतरले आहेत. मात्र, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासह नगरसेविका हर्षदा शिरसाट यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतल्याने महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष पेटल्याचे चित्र आहे. यातच शिवसेनेच्या आमदार संजना…

Read More

Sudhir Mungantiwar Clarifies Delhi Visit, Targets INDIA Alliance

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या दिल्ली दौऱ्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत, आपण मंत्रिमंडळ विस्तार किंवा मंत्रिपदासाठी दिल्लीला गेलेलो नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचवेळी त्यांनी INDIA आघाडीच्या नेतृत्वा . मोदींच्या 12 वर्षांच्या कार्यकाळाचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 12 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार म्हणाले की, हा देशासाठी…

Read More

Village Authority Restricts Security Forces Entry, Women Hold NRC Rally

Marathi News National Manipur Unrest: Village Authority Restricts Security Forces Entry, Women Hold NRC Rally इंफाळ3 तासांपूर्वी कॉपी लिंक मणिपूरमध्ये 3 वर्षांपासून वांशिक हिंसाचार सुरू आहे. राज्यात पूर्णपणे शांतता नाही. सोमवारी कांगपोकपी जिल्ह्यातील पोंग्रिंगलॉन्ग रोंगमेई नागा गावात कुकी अतिरेकी संघटनेने गोळीबार केला. या घटनेनंतर बेपत्ता झालेल्या चुन्जांग्लुंग पानमेई नावाच्या नागा ग्रामरक्षकाचा मृतदेह जंगलात सापडला आहे….

Read More

बीड हादरले!:अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने केला गेम, कार्यक्रम ओकेच्या मेसेजने गेले पकडल्या

बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 25 वर्षींय पत्नीने प्रियकराच्या मदतीने अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या 27 वर्षीय पतीचा काटा काढला आहे. अपघाताचा बनाव रचणाऱ्या पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. अपघातानंतर प्रियकराने काम फत्ते झाल्याचा निरोप दिल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. 1 जून रोजी लिंबागणेश ते अंजनवती रस्त्यावर 27…

Read More

दीपिका-रणवीर नवीन घरात दिसले:अभिनेत्रीचा बेबी बंप दिसला; दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होऊ शकतात

सोमवारी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील त्यांच्या समुद्रकिनारी असलेल्या नवीन क्वाड्रुप्लेक्स घराच्या बाल्कनीमध्ये दिसले. दोघेही घराच्या अंतर्गत सजावटीच्या कामाची प्रगती पाहण्यासाठी पोहोचले होते. समोर आलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये दीपिका पांढऱ्या को-ऑर्ड आउटफिटमध्ये दिसली, तर रणवीरने लाल टी-शर्ट, काळी पॅन्ट आणि काळी कॅप घातली होती. याशिवाय, नुकतीच दुसऱ्यांदा गर्भवती असलेल्या दीपिकाचा बेबी…

Read More

अशोक खरात प्रकरणाचे पडसाद परदेशातही:नायजेरियासह अनेक देशांत व्हिडिओंचा प्रसार, सायबर पोलिसांची मोठी कारवाई

नाशिकमधील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ आणि छायाचित्रांचा प्रसार परदेशातही झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या अनेक खात्यांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. 406 हून अधिक आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या तपासात अशोक खरात प्रकरणाशी…

Read More

सोने ₹1,095 ने वाढून ₹1.53 लाखांवर:चांदी ₹1,307 ने महाग होऊन ₹2.46 लाख झाली, कॅरेटनुसार पाहा सोन्याची किंमत

सोन्याच्या दरात आज म्हणजेच 9 जून रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर आज 1,095 रुपयांनी वाढून 1.53 लाख रुपये झाला आहे. मात्र, चांदीच्या दरात आज घसरण झाली. 1 किलो चांदीची किंमत 1,307 रुपयांनी कमी होऊन 2.46 लाख रुपयांवर आली आहे. यावर्षी सोने 19 हजार…

Read More