353 कट्टे हळद चोरीचे प्रकरण उघड:सुमारे 11 लाखांचा मुद्देमाल जप्त, चार जणांना अटक; हिंगोली पोलिसांची कारवाई
हिंगोली शहरालगत लिंबाळा मक्ता येथील औद्योगिक वसाहती मधील एका गोदामातून ३५३ कट्टे हळद चोरणाऱ्या टोळीचा अवघ्या २४ तासांत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चार मुख्य जणांना मंगळवारी अटक केली असून, सुमारे ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चोरट्यांकडून आणखी चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जून…