![]()
“गद्दार सोडून महाराष्ट्रातील कोणताही मराठी माणूस पंतप्रधान होणार असेल, तर शिवसेना त्याला नक्कीच पाठिंबा देईल,” असे मोठे विधान शिवसेना (ठाकरे गट)पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डी दौऱ्यात केले. त्यांनी केंद्रसरकार, भाजप, शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली. साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे म्हणाले, “मराठी माणसाने पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहण्यात काहीच गैर नाही. मात्र संघाचा पाठिंबाअसलेल्या नेत्यांना दिल्लीतून राजकीय शर्यतीतून दूर ठेवण्याचे कारस्थान सुरू आहे का, अशी शंका निर्माण होते. नितीन गडकरींनंतर आता देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले जात आहे का, याचाही विचार व्हायला हवा.” भाजपच्या अंतर्गत राजकारणावर टीका करताना त्यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे उदाहरण दिले. “लोकप्रिय नेत्यांचे पंख छाटण्याची प्रवृत्ती भाजपमध्ये वाढत आहे. ही फोडाफोडी संघाला मान्य आहे का, याचा विचार संघकार्यकर्त्यांनी करावा,” असे ते म्हणाले.
Source link
उद्धव ठाकरेंचा शिर्डी दौरा:"गद्दार'' वगळता मराठी माणूस पंतप्रधान होणार असेल तर पाठिंबा- उद्धव ठाकरे